क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युव कबड्डी सिरीज मध्ये आजपासून प्ले-ऑफसच्या सामान्याना सुरुवात झाली. पहिला क्वालीफायर सामना प्रमोशन फेरीतील तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला नांदेड चांबल चॅलेंजर्स संघ विरुद्ध पाचव्या क्रमांकावर राहिलेला ठाणे हम्पी हिरोज संघ यांच्यात झाला. सामन्याची सुरुवात तशी संथ झालेली मात्र अक्षय सूर्यवंशी, अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र चढायांनी 10-6 अशी नांदेड संघाने आघाडी मिळवली होती.
ठाण्याच्या मंगेश सोनावणे व चिन्मय गुरव यांनी आक्रमक चढाया करत नांदेड संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. मध्यांतरला ठाणे संघाकडे 18-16 अशी आघाडी होती. मध्यांतरा नंतर 5 मिनिट ठाणे संघाला एकही गुण मिळवता आला नाही मात्र नांदेड संघाने 4 गुण मिळवत 20-18 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर आहे ठाणे संघ ऑल आऊट झाला त्यानंतर नांदेड संघ ऑल आऊट झाला. त्यामुळे शेवटची सात मिनिटं शिल्लक असताना 29-27 अशी केवळ 2 गुणांची आघाडी ठाणे संघाकडे होती.
सामन्याची शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना 31-28 अशी आघाडी ठाणे संघाकडे होती मात्र नांदेडच्या अजित चव्हाण ने 3 गुणांची सुपर रेड करत सामना 31-31 असा बरोबरीत आणला. त्यानंतर नांदेड संघाने आक्रमक खेळ करत शेवटचा एक मिनिटं शिल्लक असताना ठाणे संघाला ऑल आऊट करत सामना 39-36 असा जिंकत अहमदनगर विरुद्ध क्वालीफायर 3 खेळण्यासाठी पात्र झाला तर ठाणे संघाला उद्या एलिमीनेटर 3 मध्ये एलिमीनेटर 1 च्या विजेत्या संघा विरुद्ध खेळावा लागेल. सदर सामन्यात नांदेड संघाकडून अक्षय सूर्यवंशी ने चढाईत 12 तर अजित चव्हाण ने 11 गुण मिळवले. ठाणे संघाकडून मंगेश सोनवणे ने चढाईत 10 तर विघ्नेश चौधरी ने 8 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- सुराज पाटील, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉशिंग्टन सुंदरबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आता कुठलाही सामना खेळू शकणार नाही, लगेच वाचा
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप