Nandre Burger Wickets: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी सेंच्युरियनमध्ये एकमेकांचा सामना करत आहेत. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर याने चांगलाच कहर केला आहे. त्याने भारताच्या स्टार खेळाडूंची विकेट काढत भारताला दबावात टाकले आहे.
नांद्रे बर्गरच्या तीन षटकात दोन विकेट्स
भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानावर उतरले होते. यावेळी भारताला पहिला धक्का रोहितच्या रूपात बसला. कागिसो रबाडा याने रोहितला नांद्रे बर्गर (Nandre Burger) याच्या हातून वैयक्तिक 5 धावसंख्येवर तंबूत धाडले. त्यानंतर बर्गरने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली. बर्गरने डावातील 10 वे आणि आपले दुसरे षटक टाकताना यशस्वी जयसवाल याला 17 धावांवर तंबूत धाडले.
Yashasvi Jaiswal dismissed for 17 in 37 balls.
Maiden Test wicket for Nandre Burger. pic.twitter.com/xNi9p4F7Q4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2023
जयसवाल ही त्याची कसोटी पदार्पणातील पहिली विकेट ठरला. त्याने जयसवालला यष्टीरक्षक काइल वेरेन याच्या हातून झेलबाद केले. बर्गर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपले तिसरे षटक टाकताना शुबमन गिल (Shubman Gill) यालाही यष्टीरक्षक वेरेनच्याच हातून तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी गिल फक्त 2 धावा करून तंबूत परतला.
Shubman Gill dismissed for 2.
India – 24 for 3. pic.twitter.com/oNXxIcAgwH
— Johns. (@CricCrazyJohns) December 26, 2023
यावेळ बर्गरने 3 षटके गोलंदाजी करताना 1 निर्धाव षटक टाकले. तसेच, 13 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. (Nandre Burger takes Yashasvi Jaiswal And Shubman Gill’s Wicket in INDvSA 1st Test)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
हेही वाचा-
लय भारी! 2023मध्ये 6 क्रिकेटर्स ठरले नशीबवान, केले भारताकडून कसोटी पदार्पण
INDvsSA 1st Test: यजमानांनी टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतासाठी कृष्णाचे पदार्पण; जड्डू बाहेर