क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये ‘ब’ गटातील तिसऱ्या दिवशी धुळे चोला वीरांस विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स या लढतीने सुरुवात झाली. दोन्ही संघांनी आपले पहिले दोन सामने गमावले असल्याकारणाने आजचा सामना महत्वाचा होता. जर टॉप 4 मध्ये आपला स्थान मिळवण्यासाठी विजयाची सुरुवात आवश्यक होती. नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाने आक्रमक सुरुवात करत धुळे संघावर लोन पाडला.
मध्यंतराला नंदुरबार संघाने 22-09 अशी आघाडी घेतली होती. नंदूरबारच्या तेजस काळभोर व तेजस राऊत ने उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवत संघाला आघाडी मिळवुन दिली. तर धुळे संघाकडून मितेश कदम एकाकी झुंज देताना दिसला. मध्यंतरा नंतर 5 मिनिटांतच धुळे संघावर आणखी एक लोन टाकत नंदुरबार संघाने आपली आघाडी मजबूत केली.
धुळे संघाच्या मितेश कदम ने सलग 3 चढाया मध्ये संपूर्ण नंदुरबार संघाला ऑल आऊट करत सामन्यात चुरस वाढवली. नंदुरबारच्या तेजस काळभोर विरुद्ध धुलेचा मितेश कदम अशी लढत बघायला मिळत होती. मितेश कदम ची एक उत्कृष्ट पकड करत नंदुरबार संघाने लोन वाचवला नाहीतर सामना आणखी चुरशीचा झाला असता. नंदुरबार संघाने 43-30 असा पहिला विजय मिळवला. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने चढाईत 16 गुण मिळवले तर श्रेयस उमरदंड ने हाय फाय पूर्ण केला. धुळे संघाकडून मितेश कदम ने चढाईत 15 गुण तर नरेंद्र खेर ने हाय फाय पूर्ण करत चांगला प्रतिकार केला. (Nandurbar Himalayan Tahrs team opened the account of victory)
बेस्ट रेडर- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
बेस्ट डिफेंडर्स- नरेंद्र खेर, धुळे चोला वीरांस
कबड्डी का कमाल- मितेश पाटील, धुळे चोला वीरांस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युझीसोबत धोका? श्रेयस आणि धनश्रीला एकत्र पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चहलला न्याय…’
आयपीएलचा जादू बनतोय बटलर! दिवसाच्या सामन्यांमध्ये उभारतोय धावांचा डोंगर, पाहा जबरदस्त आकडेवारी