पुणे (13 मार्च 2024) – ब गटातील लढतीचा आज दुसरा होता. नंदुरबार विरुद्ध सातारा यासंघात सामना झाला. नंदुरबार संघ सहजपणे विजय मिळवेल असा वाटत होता पण सामन्याच्या सुरुवातीलाच सातारच्या गणेश आवळेच्या आक्रमक चढायांनी नंदुरबार संघाला पिछाडीवर टाकले. तर साताराच्या बचावपटूंनी सुद्धा उत्कृष्ट खेळ करत नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 10-02 अशी आघाडी मिळवली.
नंदुरबारच्या ओमकार गाडे व श्रेयस उमरदंड यांनी उत्कृष्ट खेळ करत सामन्यात चुरस आणली. मध्यंतरा पर्यत नंदुरबार संघाने पिछाडी कमी करत 11-14 गुण मिळवले. मध्यंतरा नंतर सामना मात्र चुरशीचा झाला. शेवटची 9 मिनिटं शिल्लक असताना नंदुरबारच्या जयेश महाजन ने 3 खेळाडूंना बाद सातारा संघाला ऑल आऊट केले. 5 गुणांच्या या चढाई ने नंदुरबार संघाने 22-20 अशी आघाडी मिळवली.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली लढत दिली. कधी सातारा आघाडी वर तर कधी नंदुरबार संघ आघाडी घेत होता. मात्र अखेर नंदुरबार संघाने 31-27 असा विजय मिळवत गुणतालिकेत 5 गुण प्राप्त केले. नंदुरबारच्या जयेश महाजन ने सुपर टेन पूर्ण केला तर तेजस राऊत ने 7 गुण मिळवले. श्रेयस उमरदंड ने 3 पकडी केल्या. सातारा संघाकडून गणेश आवळे ने 10 गुण मिळवले. तर चैतन्य राऊत ने 4 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- जयेश महाजन, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- चैतन्य राऊत, सातारा
कबड्डी का कमाल- जयेश महाजन, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप
Ranji Trophy Final : मुंबईचा संघ ठरला 2024 चा रणजी चॅम्पियन, मुशीर खान ‘मॅन ऑफ द मॅच’