इंडियन प्रीमिअर लीग 2023 या स्पर्धेत एकूण 10 संघ 74 सामने खेळणार आहेत. हे सर्व सामना 12 मैदानावर 58 दिवस खेळले जाणार आहेत. यादरम्यान जो संघ उत्कृष्ट कामगिरी करेल त्यालाच चॅम्पियन बनण्यात यश मिळणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे स्पर्धेचा फक्त पहिलाच नाही, तर एकूण 7 सामने खेळले जाणार आहेत. कोणते आहेत ते सामने, चला जाणून घेऊयात…
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. यावेळी पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयपीएल 2022मध्ये भाग घेणाऱ्या गुजरात संघाने पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात गुजरातने किताब जिंकून सर्वांना चकित केले होते. आता जगातील सर्वात मोठ्या मैदानावर आयपीएलची सुरुवात होणार आहे. तसेच, तब्बल एक लाखांहून अधिक प्रेक्षक या सामन्याचे साक्षीदार होऊ शकतात.
नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील सात सामने
या स्टेडिअमवर साखळी फेरीतील एकूण 7 सामने खेळले जाणार आहेत. म्हणजेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ त्यांचे सर्व सामने याच मैदानावर खेळेल. 31 मार्चनंतर गुजरातचा दुसरा सामना 9 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पार पडेल. यानंतर 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध, 25 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध, 2 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, 7 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आणि 15 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल.
विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये एकूण 70 साखळी सामने असतील. यासाठी 10 संघांची विभागणी 5-5 अशा दोन गटांमध्ये केली आहे. यातील संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळतील. तसेच, इतर गटाच्या 4 संघाविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळतील आणि एका संघासोबत दोन सामने खेळतील.
गुजरात टायटन्स संघाबाबत बोलायचं झालं, तर गुजरात टायटन्स संघ ब गटात आहे. या गटात त्यांच्यासोबत चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांचा समावेश आहे. (narendra modi stadium in ahmedabad ipl 2023 matches know schedule)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय खेळाडूमध्ये विलियम्सनला दिसला भविष्यातील कर्णधार, नाव वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
वर्ल्डकप फायनलसाठी अहमदाबादची वर्णी! जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांविषयी





