भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहते मागच्या मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 मधील 12व्या सामन्यात हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने असणार आहेत. शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. चला तर जाणून घेऊ या स्टेडियमच्या खेलपट्टीविषयी.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. याठिकाणी फलंदाज तुफान खेळी करू शकतात. फलंदाजांच्या बॅटवर चेंडू या स्टेडियमवर चांगल्या पद्धतीने येतो, असेही सांगितले जाते. वेळोवेळी फलंदाजांनी आपल्या खेळीमधून हे स्पष्ट देखील केले आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज देखील याठिकाणी कमाल दाखवू शकतात. सामना जसजसा पुढे जाईल, तशी फिरकी गोलंदाजांनाही याठिकाणी मदत मिळते. मैदानाची सीमारेषा लांब असल्यामुळे गोलंदाज अधिक मोकळेपणाने गोलंदाजी करू शकतात.
याठिकाणी आतापर्यंत 29 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील 16 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा, तर 13 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 237, तर दुसऱ्या डावाची सरासरी 206 धावा राहिली आहे. (Narendra Modi Stadium pitch report for India Pakistan match)
यातून निवडली जाणार प्लेइंग इळेव्हन –
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, सौद शकील, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, शादाब खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, हसन अली, मोहम्मद वसीम, शाहीन अफ्रिदी, उस्मान मीर.
महत्वाच्या बातम्या –
भारताशी सामना करण्यासाठी पाकिस्तानने अवलंबली जुनी पद्धत, स्पॉट बॉलिंगचा केला सराव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी! मागच्या चार मॅचची आकडेवारी मान खाली घालायला लावणारी