जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम यावर्षी पार पडला. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानला पराभूत करत आपले पहिले विजेतेपद पटकावले. यासोबतच या सामन्यात एक नवा विश्वविक्रम देखील घडला होता. ज्याची औपचारिक घोषणा आता जागतिक विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी केली आहे.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने रविवारी (27 नोव्हेंबर) घोषणा केली की, आयपीएल 2022 अंतिम सामन्याला तब्बल 101,566 लोकांनी हजेरी लावली होती. कोणत्याही टी20 सामन्याला झालेली ही सर्वाधिक गर्दी आहे. आयपीएल 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता.
https://twitter.com/BCCI/status/1596820917661102082?t=3UddM5kpsvHdHNcHW0imKw&s=19
बीसीसीआयने रविवारी एक फोटो ट्विट करत याबाबत माहिती देताना म्हटले,
‘आम्हाला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक क्षमतेचा सामना यावर्षी आयपीएलचा अंतिम सामना ठरला. भारतीय क्रिकेटवर नेहमीच प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा हा विक्रम आहे.’
बीसीसीआयतर्फे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या जागतिक विक्रमाचे प्रशस्तीपत्रक स्वीकारले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा डाव 130 धावांवर रोखला होता. त्यानंतर गुजरातने केवळ तीन गडी गमावत हे विजयी लक्ष गाठले होते. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्याचा सामनावीर ठरला होता. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावणारा गुजरात हा केवळ दुसरा संघ आहे.
(Narendra Modi Stadium receives ‘Guiness World Record’ for the biggest T20 audience during the IPL 2022 Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: क्रिकेटजगतात पुन्हा फिक्सिंगचे भूत? पाकिस्तानचा ‘तो’ सामना होता फिक्स
‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश