देशासाठी विश्वचषक जिंकणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात खास क्षण असतो. हे त्याच्या कारकीर्दीतील सर्वात खास कामगिरींपैकी एक आहे. मात्र, नरेश टूमडा यांची जीवनकथा वेगळी आहे. टूमडा भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता ज्याने शारजाहमध्ये पाकिस्तानला पराभूत करून २०१८ मध्ये अंध विश्वचषक जिंकला होता. पण विश्वचषक जिंकल्यानंतर नरेश टूमडा आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी धडपडत आहेत आणि आता जगण्यासाठी मजूर म्हणून काम करत आहेत.
नरेश तुमडा यांनी वयाच्या ५ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आपले कौशल्य दाखवून प्रतिभावान क्रिकेटपटूची ओळख मिळवली होती. त्याच्या विशिष्ट शैली आणि चमकदार फलंदाजीमुळे नरेशला २०१४ मध्ये गुजरात संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याला राष्ट्रीय संघातून फोन आला आणि भारताकडून खेळण्याची संधी मिळाली होती. दुर्दैवाने, आर्थिक परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे, त्याला सध्या मजूर म्हणून काम करून उदरनिर्वाह करावा लागतो आहे.
या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ध्येय लक्षात ठेवून, त्यानी अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज केले, परंतु त्यातून ही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे भारतीय क्रिकेटपटूने सरकारकडून काही मदत करण्याची विनंती होती. तो म्हणाला की, ‘मी दिवसाला २५० रुपये कमवतो. मी सरकारला विनंती केली आहे की, मला नोकरी द्या जेणेकरून मी माझे आयुष्य चालवू शकेन.’
Gujarat: Naresh Tumda, part of team that helped India win 2018 Blind Cricket World Cup, now works as a labourer in Navsari to earn livelihood
"I earn Rs 250 a day. Requested CM thrice but didn't get reply. I urge govt to give me job so that I can take care of my family," he said pic.twitter.com/NK4DFO6YYC
— ANI (@ANI) August 8, 2021
नरेश टूमडाचा संघर्ष भारतातील अपंग क्रिकेटपटूंच्या परिस्थितीबद्दल विचार करायला लावतो. नरेश टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले होता की, ‘जेव्हा भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकला होता. तेव्हा सरकार आणि कंपन्या त्यांच्यावर पैशाचा वर्षाव करतात. आम्ही लहान आहोत कारण आम्ही अंध आहोत? समाजाने समान वागणूक दिली पाहिजे.’ अशी आशा केली जात आहे की सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देईल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या लाडक्या लेकीचे लंडनमध्ये झाले खास स्वागत, पाहा फोटो
अतिशय लाजिरवाणे! वेदनेनं भर मैदानात विव्हळत होता फलंदाज, बघून प्रतिस्पर्धींसह हसत होते पंचही
सिराजने वाढवली १०२ कसोटींचा अनुभव असलेल्या ‘या’ गोलंदाजाची डोकेदुखी, बसावं लागणार बाकावर!