---Advertisement---

अतिशय लाजिरवाणे! वेदनेनं भर मैदानात विव्हळत होता फलंदाज, बघून प्रतिस्पर्धींसह हसत होते पंचही

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 3:41 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या सामन्यांमध्ये आपल्याला अनेक चांगल्या-वाईट घटना पाहायला मिळाल्या आहेत. याच दरम्यान एक अशी घटना घडली जी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे, चालू सामन्यात इंग्लंड संघाचा फलंदाज ऍलेक्स हेल्सला शारारिक वेदना सुरू झाल्या होत्या. पण विरोधी संघाचे खेळाडू त्याला मदत करण्याऐवजी हसायला लागले होते.

फलंदाज मैदानावर वेदनांचा करत होता सामना
वास्तविक, इंग्लंडमध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यातील द हंड्रेड स्पर्धेच्या सामन्यात ही घटना घडली होती. फलंदाज ऍलेक्स हेल्स सलग दोन चेंडू खेळत असताना वेदनेने विव्हळताना दिसत होता. ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज ऍलेक्स हेल्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विरोधी खेळाडू मदत करण्याऐवजी हसत होते
या सामन्यादरम्यान ओव्हल इनविंसिबल संघाचा गोलंदाज रीस टोपलेचा एक चेंडू ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज ऍलेक्स हेल्सच्या कंबरेवर जाऊन लागला. त्यानंतर तो जमिनीवर पडला आणि वेदना जाणवू लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विरोधी संघातील एकही खेळाडू वेदनांनी ग्रस्त ऍलेक्स हेल्सच्या मदतीला आला नाही.

https://twitter.com/sparknzsport/status/1424546898480832514?s=20

पंचांचीही प्रतिस्पर्धी खेळाडूंना साथ
वेदनांनी ग्रस्त ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज ऍलेक्स हेल्सला मदत करण्याऐवजी विरोधी संघाचे खेळाडू त्याची मज्जा घेत हसताना दिसून आले. इतकेच नव्हे तर सामन्यातील पंचसुद्धा स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या सर्व घडलेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सिराजने वाढवली १०२ कसोटींचा अनुभव असलेल्या ‘या’ गोलंदाजाची डोकेदुखी, बसावं लागणार बाकावर!

बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२व्या वर्षी सीएसकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतली हॅट्रिक, रचला इतिहास

थाला इज बॅक! धोनीचे चेन्नई विमानतळावर आगमन, व्हिडिओ आणि फोटो होतायेत जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---