एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामातील बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना काही वेळातच सुरू होणार आहे. हा सामना दुबई येथे रविवारी (28 ऑगस्ट) सांयकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी कसून सराव केले आहे. या सामन्यामुळे क्रिकेटविश्वातील वातावरण आधीच तापलेले असताना पाकिस्तानकडून एक मोठी बातमी पुढे येत आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) हा भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. या 19 वर्षीय खेळाडूने नुकतेच नेदरलॅंड्स विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नाणेफेक झाली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नसीम हा पाकिस्तानचा ९६वा टी२० खेळाडू आहे. त्याला हसन अली याच्याकडून टी२०ची कॅप मिळाली आहे.
.@iNaseemShah – Pakistan's T20I player No.96 🇵🇰
🧢 The young speedster is awarded his T20I debut cap 👏#AsiaCup2022 | #INDvPAK pic.twitter.com/eOC3AqMJ3V
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 28, 2022
पाकिस्तान क्रिकेटने ट्वीटरवर नसीमबाबत माहिती दिली आहे. पीसीबीने म्हटले की, युवा वेगवान गोलंदाज एशिया कप २०२२मध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करत आहे. त्यांनी नसीमचा व्हिडिओही पोस्ट केले आहे. त्या व्हिडिओमध्ये नसीमने म्हटले, क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना आंनद होत आहे.
🗣️ "Happy to represent Pakistan in all formats"@iNaseemShah will be making his T20I debut today against India 👏#AsiaCup2022 | #INDvPAK pic.twitter.com/cc9IDCEGhk
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 28, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण
महायुद्धाला सुरूवात! नाण्याचे नशिब भारताच्या बाजूने; टीम इंडिया करणार बॉलने पहिला वार
रिक्षा चालकाचा मुलगा आता भारतीय संघात बनवतोय आपली खास जागा! बिहारशी खास कनेक्शन