आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच सर्व क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची उत्सुकता लागली होती ते क्षण अखेर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला अखेर सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यात झालेल्या नाणेफेकीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
तब्बल 10 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर त्याच दुबईच्या मैदानावर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरला आहे. यावेळी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग 11 निवडत असताना अनेक गोष्टींचा काळजी घेतली असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे पाकिस्तानी संघाने देखील मजबूत खेळाडूंना या महत्वाच्या सामन्यात संधी दिली आहे.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
Captain @ImRo45 has won the toss and we will bowl first against Pakistan.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/O0HQXFQzC4
— BCCI (@BCCI) August 28, 2022
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान
???? India have won the toss and opted to field first ????
Our playing XI for the #INDvPAK clash ????#AsiaCup2022 pic.twitter.com/IvCkAI5wUd
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 28, 2022
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद नवाज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
अल्टिमेट खो खो स्पर्धेत सलग पाचव्या विजयासह ओडिशा जगरनट्स प्लेऑफ साठी पात्र






