सध्या सुरू असलेला आशिया चषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुपर फोर फेरीतील अवघे दोन सामने खेळणे बाकी असतानाच पाकिस्तान संघासाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज नसीम शहा दुखापतीच्या कारणास्तव आशिया चषकातून बाहेर होत आहे. जमान खान नसीमचा बदली खेळाडू म्हणून राहिलेल्या आशिया चषक सामन्यांमध्ये खेळताना दिसेल.
रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना सुरू झाला, जो पावसामुळे सोमवारपर्यंत लांबला. या सामन्यात भारताने 228 धावांनी मोठी विजय मिळवला. पण पाकिस्तानचे दोन वेगवान गोलंदाज नसीम शहा () आणि हॅरिस रौफ () यांना दुखापत झाल्याचे समोर आले. नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे सांगितले गेले असून तो सध्या पाकिस्तान संघाच्या मेडिकल टीमच्या देखरेखीत आहे. आगामी वनडे विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून संघ व्यवस्थापनाने नसीमला राहिलेल्या आशिया चषक सामन्यात विश्रांती दिली आहे. त्याच्या गाजी युवा झमान खान याला वनडे पदार्पणाची संधी दिली जाईल.
झमान खान याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण वनडे क्रिकेटमध्ये अद्याप त्याला संधी दिली गेली नाहीये. पाकिस्तानला आपला पुढचा सामना गुरुवारी (14 सप्टेंबर) श्रीलंकेसोबत खेळायचा आहे. या सामन्यात नसीमच्या जागी झमान खेळताना दिसू शकतो. उभय संघांतील ही लढत अतितटीची होऊ शकते. कारण भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. पण दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धा आहे. असात गुरुवारचा हा सामना निर्णायक ठरेल.
वृत्तांनुसार हॅरिस रौफ याच्यावर देखील पाकिस्तान संघाच्या मेडिलक टीम नजर ठेवून आहे. रौफला देखील भारताविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याचे समोर आल होते. याच कारणास्तव राखीव दिवशा सामना सुरू झाल्यानंतर त्याने एखही षटक गोलंदाजी केली नाही. असे असले तरी, रौफ झटपट या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याला आशिया चषक संघात कायम ठेवले गेले आहे. (Naseem Shah ruled out of Asia Cup 2023)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’
ICC ODI Rankings: 2019नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाचे 3 फलंदाज टॉप-10मध्ये, गिलकडून बाबरला आव्हान