आयसीसी टी20 विश्वचषकाची सुरुवात (ICC T20 World Cup) येत्या 2 जूनपासून होणार आहे. 9 व्या टी20 विश्वचषकाचा शुभारंभ अमेरिका विरुद्ध कॅनडा या सामन्यापासून होणार आहे. तर भारतीय संघ त्यांचा पहिला सामना 5 जूनला आयरलैंंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन झालेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ याच मैदानावर आमनेसामने असणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जूनला खेळला जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये बनलेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं सौंदर्य खूप खास आहे. जेव्हा भारतीय फॅन्सला समजलं की भारत विरुद्ध पाकिस्तान लढत याच मैदानावर होणार आहे. तेव्हापासून या स्टेडियमची चर्चा होताना दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की त्या मैदानाचं सौंदर्य खूप खास आहे. लोक या मैदानाची तुलना अमेरिकेच्या व्हाइट हाऊसशी देखील करताना दिसत आहेत.
न्यूयॉर्कच्या या मैदानावरती टी20 विश्वचषकाच्या 8 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून ड्रॉप इन खेळपट्ट्या तयार केल्या जात होत्या. या मैदानावर प्रेक्षकांना बसण्यासाठी 34000 सीट आहेत. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे सीटसुद्धा जवळजवळ तेवढेच आहेत.
या स्टेडियमवर खेळले जाणारे 8 सामने ड्रॉप इन खेळपट्ट्यांवर खेळले जाणार आहेत. 4 खेळपट्ट्या नासाऊ स्टेडियमवर केल्या आहेत. तर 6 खेळपट्ट्या आसपास सरावासाठी केल्या आहेत. ड्रॉप इन खेळपट्ट्या त्या असतात. ज्या मैदानापासून किंवा त्या ठिकाणापासून थोड्या लांब बनवल्या जातात. नंतर त्या खेळपट्ट्या क्रेन किंवा ट्रकने आणून मैदानावरती मांडल्या जातात.
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
टी20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तान संघ- बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
महत्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्सच्या संघाची आणखी एका फायनलमध्ये धडक, हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, मोहम्मद अमीरचं पुनरागमन