इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरात कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा अंतिम सामना रद्द झाला. इंग्लंडच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ आणि आयपीएलला दोष दिला आहे. मात्र इंग्लडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत वेगळे आहे.
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी मँचेस्टर कसोटी रद्द होण्यासाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले की ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळली जाणारी पाचवी कसोटी रद्द होण्यास भारताचा कुठलाही दोष नाही.
मायकेल वॉन आणि स्टीव्ह हार्मिसन यांच्यासह इंग्लंडच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी, मँचेस्टर कसोटी रद्द होण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू, बीसीसीआय तसेच आयपीएलला दोष दिला होता. मात्र, इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत मात्र वेगळे आहे. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना रद्द करण्यात भारताचा कुठलाही हात नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
नासिर हुसेन यांनी आपल्या डेली मेलच्या कॉलममध्ये लिहिले आहे, “शुक्रवारी मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, ज्या लोकांमुळे मला सर्वात जास्त वाईट वाटले ते आमच्या क्रीडा क्षेत्रातील होते. त्यात काही अत्यंत आदरणीय आणि चांगले व्यक्तीही होते. या सगळ्यात भारत नव्हे तर क्रिकेट संघांचे व्यस्त वेळापत्रक जबाबदार होते.” नासिर पुढे म्हणाले, रद्द झालेल्या कसोटीचा परिणाम हजारो प्रेक्षकांवर झाला, जे दोन चांगल्या संघांमधील मालिका पाहण्यासाठी मँचेस्टरला आले होते.
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाले की, मँचेस्टर कसोटी सामन्याचे त्वरित पुनर्नियोजन करणे सोपे नाही, शिवाय इतक्यात ते शक्यही नाही. पाचव्या कसोटीच्या संपण्याच्या नियोजित तारखेनंतर ठीक चार दिवसांनी आयपीएल सुरू होणार होती, यामुळे सामन्याचे पुन्हा आयोजन करणे अशक्य झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी आयपीएलची! वॉर्नरने क्लारंटाईन असतानाही हॉटेलरूममध्येच सुरू केली प्रॅक्टिस, पत्नीची खास कमेंट
‘हे’ आहेत कसोटीत आठव्या क्रमांकावर दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारे ४ भारतीय फलंदाज