---Advertisement---

आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO

---Advertisement---

इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड लीग सुरु आहे. या लीगमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांमध्ये सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेत दररोज बॉल आणि बॅटमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी या लीगमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट घडली ज्याची खूप चर्चा होत आहे. द हंड्रेड महिला संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यात चेंडू स्टंपला लागला. मात्र, चेंडू स्टंपला लागल्यानंतरही फलंदाज बाद होण्यापासून बचावला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही सर्व घटना द हंड्रेड स्पर्धेत (10 ऑगस्ट) रोजी महिला संघ ट्रेंट रॉकेट्स आणि सदर्न ब्रेव्ह यांच्यातील सामन्यादरम्यान घडली. दोन्ही संघांमधील हा सामना द रोझ बाउल स्टेडियमवर खेळला जात होता. या सामन्यात ट्रेंट रॉकेट्स संघाची फलंदाज नेट सायव्हर ब्रंट (Nat Sciver Brunt) बाद होण्यापासून बचावली. डावाच्या 63व्या चेंडूवर नेट सायव्हर ब्रंटला जीवनदान मिळाले.

लॉरेन बेल हे षटक सदर्न ब्रेव्हच्या ऐवजी षटक टाकत होती. लॉरेन बेलनं स्लो चेंडू नेट सायव्हर ब्रंटच्या पायाकडे टाकला. चेंडूनं ब्रंटच्या बॅटची कड घेतली आणि तिच्या बूटावर आदळला आणि थेट स्टंपवर गेला. मात्र, चेंडू स्टंपला लागल्यानंतरही बेल्स पडल्या नाही. बेल्स न पडल्यामुळे ब्रंट बाद होण्यापासून बचावली. द हंड्रेडने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन नेट सायव्हर ब्रंटचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात बाद होण्यापासून वाचल्यानंतर तिनं पुरेपूर फायदा घेतला. तिनं उत्कृष्ट फलंदाजी करत 37 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 60 धावांची खेळी खेळली.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी, रोहित, कपिल देव नव्हे ‘हा’ आहे भारताचा महान कर्णधार! इंग्लंडच्या दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं
भारतीय संस्कार! कांस्यपदक जिंकताच हाॅकी संघ देव दर्शनाला, पाहा सुंदर VIDEO

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---