कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) झाला. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केले आहे. त्याला भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. टी नटराजन भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३२ वा खेळाडू ठरला आहे.
तो भारताकडून वनडे पदार्पण करणारा एकूण ११ वा डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला. भारताने आत्तापर्यंत ९९० वनडे सामने खेळले आहेत मात्र आत्तापर्यंत नटराजनसह केवळ १० डावखुरे वेगवान गोलंदाजांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
नटराजनने यंदा आयपीएलमध्ये खेळताना सर्वांना प्रभावित केले होते. विशेषत: त्याच्या यॉर्कर चेंडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात १६ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या होत्या.
याआधी भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळलेले डावखुरे वेगवान गोलंदाज –
1) कर्सन घावरी
2) रुद्र प्रताप सिंग (1984-1996)
3) राशिद पटेल
4) झहीर खान
5) आशिष नेहरा
6) इरफान पठाण
7) रुद्र प्रताप सिंग (2005-2011)
8) जयदेव उनाडकट
9) बरिंदर स्त्रान
10) खालील अहमद
11) टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत विराटचा ‘भीमपराक्रम’, सचिनच्या धावांचा ‘तो’ विक्रमही मोडला
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’