---Advertisement---

“जज करू नका…”, घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकनं मुलासोबत शेअर केला व्हिडिओ

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2024 7:50 AM
Hardik Pandya And Natasha Stankovic
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या कायम चर्चेत असतो. हार्दिक कधी त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो. हार्दिक आणि पत्नी नताशा गेल्या महिन्यातच एकमेकांपासून वेगळे झाले. 18 जुलै 2024 रोजी या जोडप्यानं घटस्फोट घेतल्याची पुष्टी केली.

हार्दिकपासून विभक्त होताच नताशा मुलगा अगस्त्यसह आपल्या देशात म्हणजेच सर्बियाला परत गेली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वतःबद्दल आणि अगस्त्याबद्दलचे अपडेट्स देत असते. अलीकडेच नताशानं मुलगा अगस्त्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला आहे.

नताशा स्टॅनकोविकनं मुलगा अगस्त्यासोबत एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. यामध्ये ती अगस्त्यचं हेअरकट करत आहे आणि अगस्त्य त्याच्या आईशी बोलताना दिसत आहे. नताशानं स्टोरीच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, तिच्या हेअरस्टाइलला जज करू नका. ती तिचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करते. या प्लॅटफॉर्मवर तिचे चार लाख पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

हार्दिकपासून वेगळी झाल्यानंतर नताशा एकटीच आपल्या मुलाची  काळजी घेत आहे. ती कधी अगस्त्यसोबत खेळताना तर कधी स्विमिंग करताना दिसते. नुकत्याच समोर आलेल्या काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्यातील दुरावा हार्दिकमुळे आला आहे. हार्दिकनं नात्यात फसवणूक केल्याचं यात म्हटलं आहे. नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकचे दुसऱ्या एका मॉडेलशी अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा – 

“तु मला खूप आनंद दिला” धवनच्या निवृत्तीनंतर दिग्गजाचा भावनिक संदेश
2024च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला केलं मुद्दाम ट्रोल, मोठं कारण उघडकीस
पाकिस्तानच्या संघात मोठा फेरबदल, टी20 विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृ्त्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---