बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सध्या ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. त्या मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी(६ ऑगस्ट) ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने तिसऱ्या टी२० सामन्यात १२७ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया संघाला सामना जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने हा सामना १० धावांनी गमावला.
एका क्षण असा होता की बांगलादेशचा संघ १४० पेक्षा जास्त धावा करेल असे दिसत होता. पण ऑस्ट्रेलिया संघासाठी टी२० मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या सलग तीन चेंडूंमध्ये ३ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. त्याने फक्त टी२० पदार्पणातच हॅट्रिक पूर्ण केली नाही, तर विक्रमही केला.
एलिस हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅट्रिक घेणारा इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे. बांगलादेश फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंमध्ये त्याने बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान आणि हसनला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली.
पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना ऑस्ट्रेलिया संघासाठी करा किंवा मरो असा होता. कारण, यापूर्वीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने गमावले होते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत पुनरागमन करण्यास प्रयत्नशील होता. परंतु, फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया ११७ धावाच करु शकला.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बांगलादेश संघाचा फलंदाज माहमुदुल्लाहने सर्वाधिक ५२ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून मिशेल मार्शने सर्वाधिक ५१ धावा काढल्या. त्याचबरोबर बांगलादेश संघाचा गोलंदाज इस्लामने २ गडी बाद केले तर अहमद आणि हसनने प्रत्येकी १ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून एलिसने ३ गडी बाद केले. त्याचबरोबर हझलवूड आणि झंपाने प्रत्येकी २ गडी बाद केले आहे. तर या सामन्यात माहमुदुल्लाहला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी
बुमराहच्या षटकाराने सर्वांनाच घातली भुरळ, सचिनही झालाय प्रभावित; तुम्ही तो सिक्स पाहिलाय ना?
सॅम करनच्या षटकात बुमराहने केला चौकार-षटकारांचा वर्षाव, गोलंदाजाच्या चेहऱ्याचा उडाला रंग