भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगला आहे. मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला, तेव्हा भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीपुढे ऑस्ट्रेलिया फलंदाज लवकरच गारद होतील, असे वाटत होते. मेलबर्नमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या 9 विकेट्स देखील पडल्या होत्या. पण स्काॅट बोलँड आणि नाथन लायनने 10व्या विकेटसाठी अवैद्य भागीदारी रचली.
कांगारू संघाचे स्टार खेळाडू नाथन लायन (Nathan Lyon) आणि स्कॉट बोलँड (Scott Boland) या दोघांनीही दिवसाचा खेळ संपेपर्यंत शानदार लढत देत संघाला संकटातून सोडवले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत लायन आणि बोलँड यांनी 100 हून अधिक चेंडू खेळले होते. यासोबतच त्यांनी एक मोठा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
वास्तविक, नाथन लायन, स्कॉट बोलँड यांनी मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावात 10व्या विकेटसाठी 50 हून अधिक चेंडू खेळून भागीदारी केली आहे. 1961 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये 10व्या विकेटसाठी दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त चेंडूंची भागीदारी होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. लायन आणि बोलँडच्या आधी हा पराक्रम अफाक हुसैन आणि हसीन अहसन यांनी पाकिस्तानविरूद्ध केला होता. या दोघांनी 1961 साली इंग्लंडविरूद्ध लाहोर कसोटीत 9.2 षटके म्हणजे पहिल्या डावात 56 चेंडू आणि दुसऱ्या डावात 18.1 षटके म्हणजे 109 चेंडू खेळून भागीदारी केली होती.
दुसरीकडे, लायन आणि बोलँड यांच्यातील भागीदारीकडे पाहिले तर. त्यांनी 10व्या विकेटसाठी 9.2 षटकांची म्हणजे पहिल्या डावात 56 चेंडू आणि 17.4 षटकांची म्हणजेच दुसऱ्या डावात 106 चेंडूंची भागीदारी केली. दुसऱ्या डावात 10व्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. दोघांच्या फलंदाजीच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 333 धावांची अवेद्य आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC फायनलचं समीकरण बदललं, भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का!
दक्षिण आफ्रिकेची WTC फायनलमध्ये थाटात एंट्री! रोमहर्षक कसोटीत पाकिस्तानचा पराभव
बुमराहसारखा दुसरा कोणीच नाही! मेलबर्न कसोटीत केले हे 5 मोठे रेकॉर्ड