ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा पाहुणे ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. असे असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने दुखापतग्रस्त असताना देखील लंगडत मैदानावर उतरत सर्वांची वाहवा मिळवली.
Fair play Nathan Lyon 👏 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/ZiqstQkU16
— England Cricket (@englandcricket) July 1, 2023
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करत असताना लायन याला दुखापत झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो मैदानावर येताना कुबड्यांच्या सहाय्याने आला. त्याचे हे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर चौथ्या दिवशी संघाला फलंदाजीसाठी गरज असताना, अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे धारिष्ट त्याने दाखवले. लॉर्ड्स क्रिकेट मैदानाच्या लॉंग रूममधून बाहेर येताना तसेच, मैदानावर पाऊल ठेवताना चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडत त्याने तेरा चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. विशेष म्हणजे हा लायनचा शंभरावा कसोटी सामना आहे. सलग 100 कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.
या सामन्याचा विचार केल्यास, स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा बनवल्या. इंग्लंड आपल्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या या धावांच्या फारसा जवळ जाऊ शकला नाही. डकेट व रूट यांच्या फलंदाजीमुळे ते 315 पर्यंत मजल मारू शकले. उस्मान ख्वाजाच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 279 धावा केल्या व यजमान संघासमोर विजयासाठी 371 धावांचे लक्ष ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 4 बाद 114 धावा केल्या आहेत. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलिया 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
(Nathan Lyon Batting With One Leg Have Standing Ovation At Lords Test)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात