---Advertisement---

नॅथनच्या चेंडूवर ‘असा’ पकडला स्मिथने शुबमन गिलचा सोपा झेल, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 11:39 AM
---Advertisement---

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी झगडताना दिसत आहे. तर यजमान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजही आपले सर्वोत्तृष्ट देत सामना खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्या झुंजार खेळीमुळे भारताने पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत १५० हून अधिक धावा केल्या.

गिलच्या जबरदस्त फटकेबाजीला पाहून सर्वांना तो शतक करतो की काय?, असे वाटत होते. परंतु नॅथन लायनच्या फिरकीत फसल्याने गिल शतक करण्यापुर्वीच बाद झाला.

झाले असे की, गिल चेतेश्वर पुजारासोबत मिळून डावास चालना देत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने त्यांची भागिदारी तोडण्यासाठी फिरकीपटू लायनचे अस्त्र वापरण्याचा विचार केला आणि डावातील ४८ षटक त्याच्याकडे सोपवले. षटकातील पहिल्या पाच चेंडूंमध्ये लायनला विकेट मिळाली नाही. त्यामुळे शेवटचा चेंडू त्याने अतिशय चपळाईने टाकला. तो चेंडू गिलच्या बॅटच्या एका कडेला लागून मागे आउटसाइड ऑफच्या दिशेने गेला.

यष्टीमागे उभा असलेला टीम पेन चेंडू पकडू शकला नाही. परंतु तिथेच क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या स्टिव्ह स्मिथने वेगाने दोन्ही हातांनी गिलचा सोपा झेल पकडला. त्यामुळे १४६ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकार मारत ९१ धावांवर गिल बाद झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गिलचा झेलबाद होतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

 

कसोटी मालिकेत गिलच्या २५० हून अधिक धावा

असे असले तरी, गिलने मोठा विक्रम केला आपल्या नावे नोंदवला आहे. वर्ष २००० पासून २२ पेक्षा कमी वय असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिलने चौथे स्थान पटकावले आहे. मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मेलबर्न कसोटी आणि पुढील सिडनी कसोटीत एका अर्धशतकासह त्याने एकूण १६१ धावा केल्या.

त्यानंतर द गॅबा स्टेडियमवर चालू असलेल्या ब्रिस्बेन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून ९८ धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्यात मिळून त्याने २५९ धावा खात्यात जमा करत हा किर्तीमान मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ३ बाद १८३ धावा; पुजाराची अर्धशतकाकडे वाटचाल…

लहान वय असले तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडणारे युवा फलंदाज, दोन आहेत भारतीय 

‘गिल है की मानता नही!’ विरूकडून खास अंदाजात शुबमनचं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---