सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारतात वनडे विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जातेय. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेसाठी एक मजबूत संघ भारतात आणला असला तरी, आता ऑस्ट्रेलियाच्या एका अनुभवी खेळाडूने आपण विश्वचषकासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
भारतात होत असलेल्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा पंधरा सदस्यीय संघात अनेक नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. या संघात फिरकी गोलंदाजीची धुरा एकटा ऍडम झम्पा सांभाळतोय. त्याला फिरकी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल साथ देईल. याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ मार्नस लॅब्युशेन हे कामचलाऊ फिरकी गोलंदाज संघाकडे आहेत. अशात आता ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन याने आपण विश्वचषकासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
लायन म्हणाला,
“मी आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झालो असून संघात निवडीसाठी तयार आहे. मला भारतात होत असलेला विश्वचषक खेळायला आवडेल.”
लायन ऍशेस मालिकेतील दुसरा सामना खेळता दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो मैदानावर उतरू शकलेला नाही. तसेच तो मागील चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा भाग नाही. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना मागील विश्वचषकात खेळलेला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या त्या 2019 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने अखेरच्या वेळी हजेरी लावलेली. त्यानंतर संघात तो आपली जागा करू शकलेला नाही.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ऍलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, ऍडम झम्पा, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, सीन ऍबॉट व ट्रेविस हेड.
(Nathan Lyon Confirm He Is Available For ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI