---Advertisement---

‘तो’ चेंडू टाकला आणि रोहितची विकेट मिळाली, नॅथन लायनने केला रणनीतीचा खुलासा

On: रविवार, जानेवारी 17, 2021 10:38 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या 369 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात शुभमन गिलला लवकर गमावले होते. यानंतर मात्र रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा मध्ये उत्तम भागीदारी सुरू होती. रोहित अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता व तो ऑस्ट्रेलियासाठी मोठे संकट जाणवत होता. मात्र या दरम्यानच नॅथन लायनच्या एका चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहित बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लायनने रोहितच्या विकेट संदर्भातल्या आपल्या रणनीतीचा खुलासा केला आहे. लयानने स्पष्ट केले की रोहित हा जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याला बाद करण्यासाठी सर्वोत्तम चेंडू टाकने गरजेचे असते. लायन म्हणाला की ‘मी ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकत होतो, जो माझा सर्वोत्तम चेंडू आहे. मला माझा सर्वोत्तम चेंडू टाकण्यात यश मिळले व मी रोहितला बाद केले.’

रोहित 74 चेंडूवर 44 धावा करून बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व निर्माण झाले. दुसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र पावसामुळे रद्द झाल्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व कायम ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताने 87 षटकात 6 गडी गमावत 253 धावांपर्यंत मजल मारली होती. वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकुरमध्ये उत्तम अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अर्जुन तेंडूलकरचे मुंबई संघाकडून पदार्पण, इंग्लंडच्या ‘या’ महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा

बापरे! ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ४ वर्षात चेतेश्वर पुजाराने खेळलेत ‘एवढे’ चेंडू; बाकी खेळाडू जवळपासही नाहीत

बंदर क्या जाने अद्रक का स्वाद..! सनग्लासेसवरुन पंतची थट्टा करणाऱ्या समालोचकांना चाहत्यांनी केले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---