भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला होता. ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या मालिकेतील विजयानंतर भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना १८ ते २२ जून २०२१ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
या मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या फिरकी गोलंदाज नॅथन लायनने मोठे भाष्य केले आहे.
भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज गोलंदाज नॅथन लायनने, मी अंतिम सामना पाहणार नाही असे भाष्य केले आहे.
तसेच तो म्हणाला, “मला वाटते की भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे. जर अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये होत असता तर आम्ही ड्यूक चेंडूची निवड केली नसती. कारण ड्यूक्स चेंडू जास्त स्विंग होतो आणि न्यूझीलंड संघाकडे उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहेत. अशा मोठ्या सामन्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. जर ड्यूक्स चेंडूने सामना खेळवला गेला तर न्यूझीलंड संघाला याचा नक्कीच फायदा होईल.”
बॉर्डर – गावसकर ट्रॉफी बद्दल बोलताना लायन म्हणाला…
“माझ्या साठी वैयक्तिकरित्या ही एक उत्कृष्ट मालिका होती. आम्ही या मालिकेत चांगले प्रदर्शन केले, पण अजून चांगले प्रदर्शन करू शकलो असतो. आम्हाला खूप संधी मिळाली पण आम्ही झेल टिपले नाही. खरं तर आम्ही तितक्या धावा केल्याच नाही जितक्या करायला हव्या होत्या. टिम पेनने जेव्हा रिषभ पंत ७ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा तो झेल टिपला असता,तर निकाल काही वेगळा असता. मी कोणावर आरोप नाही करत आहे. मला माहित आहे सर्वांनीच खूप मेहनत घेतली होती. हा खेळाचा एक भाग आहे. दुर्भग्याने जेव्हा मी बसतो तेव्हा त्या झेल बद्दलच जास्त विचार करत असतो,” असे लायन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
मोठी बातमी! आयपीएल सुरु होण्याआधीच केकेआर संघाला धक्का, ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय