दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या (AUSvSA) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि दोन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेने सुरूवात झालेल्या या दौऱ्यात यजमानांनी पहिला सामना जिंकला. दुसरा सामना बॉक्सिंग डे म्हणजे सोमवारपासून (26 डिसेंबर) खेळला जात आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक दिसली. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी आफ्रिकेच्या डावातील 13वे षटक वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅंड टाकत होता. त्या षटकातील पहिल्या चेंडूचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) याने अगदी उत्तमरित्या बचाव केला. तो चेंडू स्टम्पला लागला, मात्र बेल्स काही पडल्या नाही. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, ‘मला वाटते हे सांताकडून तुझ्यासाठी गिफ्ट होते… सांता आला आणि तुला गिफ्ट देऊन गेला.’ यावर एल्गर म्हणाला ‘मी चांगला मुलगा आहे.’
या घटनेचा व्हिडिओ क्रिकेट डॉट कॉम एयूने ट्वीट केला आहे. एल्गर 26 धावा करत बाद झाला. त्याला मार्नस लॅब्यूशेनने धावबाद केले.
How many times have we seen that one!?
Dean Elgar with the rub of the green!#AUSvSA #BoxingDayTestMatch #TestCricket pic.twitter.com/7Xnsq1L1hm— OneCricket (@OneCricketApp) December 26, 2022
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावसंख्येवरच आटोपला. आफ्रिकेकडून काइल व्हेरेने आणि मार्को यान्सेन यांनी सर्वाधिक धावा केल्या. व्हेरेनेने 52 आणि यान्सेनने 59 धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10.4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे. Nathan Lyon sledge Dean Elgar AUSvSA Boxing Day Test Video
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू झाला असून डेविड वॉर्नर आणि लॅब्यूशेन खेळपट्टीवर उपस्थित आहे. या सामन्याचा पहिला दिवस संपला असून ऑस्ट्रेलियाने 45 धावा करत एक विकेट गमावली. उस्मान ख्वाजा 1 धाव करत बाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका 189 धावांवर भुईसपाट, ग्रीनने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स
आफ्रिदीच्या हाती सुत्र येताच ‘हा’ दिग्गज संघाबाहेर, बाबरवर हाताची घडी घालून बघत राहण्याची वेळ