भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. त्यामुळेच त्याचे महत्त्व खूप वाढते. यजमान ऑस्ट्रेलियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे जेणेकरून ते मालिकेत आघाडी घेऊ शकेल. यासाठी ते आपल्या संघात मोठे बदलही करू शकतात. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यातून सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला वगळू शकतो. त्याची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही आणि त्यामुळे त्याला बाहेर केले जाऊ शकते.
नॅथन मॅकस्वीनीबद्दल बोलायचे झाल्यास तर त्याची कामगिरी आतापर्यंत समाधानकारक नव्हती. गेल्या महिन्यातच त्याने पदार्पण केले होते. परंतु अद्याप त्याला कोणतीही छाप सोडता आलेली नाही. आतापर्यंत त्याला 3 सामन्यात केवळ 72 धावा करता आल्या आहेत. अनेक डावांत तो 10 चा आकडाही गाठू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि कोड स्पोर्ट्सनुसार, नॅथन मॅकस्विनीला खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघातून वगळले जाऊ शकते. नॅथनच्या जागी युवा फलंदाज सॅम कोन्टासचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला जाऊ शकतो. मात्र, राखीव फलंदाज जोश इंग्लिसचाही समावेश होऊ शकतो. मेलबर्न कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ शुक्रवारी जाहीर होणार आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या जोश हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी सामना जिंकून पुनरागमन केले. ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना सततच्या पावसामुळे अनिर्णित राहिला.
हेही वाचा-
भारतीय फलंदाजाने रचला मोठा विक्रम, ठोकले टी20 मधील सर्वात जलद अर्धशतक
टीम इंडियाने 5 वर्षांचा दुष्काळ संपवला, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकून विक्रम केलाऑ
“विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा