हैद्राबाद :- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी ४९व्या कुमार/कुमारी गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. हैद्राबाद येथील कसानी कृष्णा मुदिराज आणि जे. एस. गेहलोत कबड्डी अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या आज सकाळच्या सत्रात झालेल्या मुलांच्या ह गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने नवख्या अरुणाचल प्रदेशचा ५४-०४ असा धुव्वा उडविला. जोरदार सुरुवात करीत पूर्वार्धातच ३ लोण देत महाराष्ट्राने ३३-०२ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात देखील खेळाची गती कायम ठेवत गुणांचे अर्धशतक पार केले. रजत सिंग, राज निंबाळकर यांच्या झंझावाती चढायांना रोखणे प्रतिस्पर्धी संघाला जड जात होते. बचावाची बाजू जयेश महाजन यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. मुलांच्या गटात उत्तर प्रदेश, मणिपूर, हे अन्य दोन संघ आहेत.
मुलींच्या ई गटात महाराष्ट्राने कर्नाटकला ४९-३१ असे रोख बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला. पहिल्या सत्रात चुरशीने खेळलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने १९-१७ अशी २ गुणांची आघाडी राखली होती. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या वैभवी जाधव, हरजित कौर संधू यांनी अधिक आक्रमक खेळ करीत सामना आपल्या बाजूने झुकविली. त्यांना याशीका पुजारी हिने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. या गटात ३ संघच आहेत. त्यामुळे गटात विजेतेपद मिळविण्या करीता महाराष्ट्राला दिल्लीशी भिडावे लागेल. (National Kabaddi Tournament. Winning opening for both teams of Maharashtra)
अन्य निकाल संक्षिप्त कुमार गट :- १)तेलंगणा वि. वि. झारखंड(४६-४२); २) राजस्थान वि. वि. ओरिसा(४८-२५); ३)हरियाणा वि. वि. गुजरात(५८-२६); ४)पाँडिचेरी वि. वि. चंदीगड(४०-३५).
कुमारी गट :- १)गोवा वि. वि. तेलंगणा(४६-४२); २)राजस्थान वि. वि. ओरिसा(५८-२२); ३)बिहार वि. वि. जम्मू – काश्मीर(७०-१५); ४)हिमाचल प्रदेश वि. वि. तामिळनाडू(४४-३०).
महत्वाच्या बातम्या –
विसरू नका बाहेर ‘तो’ वाट पाहत आहे! फ्लॉप ठरलेल्या गिल-अय्यरला दिग्गजाचा थेट इशारा
IND vs ENG । जयस्वालच्या शतकानंतर राजस्थान रॉयल्सकडून रोहितला श्रेय! फ्रँचायझीची पोस्ट तुफान व्हायरल