---Advertisement---

भारतीय संघात निवड न झाल्यानंतर आली नटराजनची प्रतिक्रिया, म्हणाला…

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 3:57 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंडचे संघ या शुक्रवारपासून ( ५ फेब्रुवारी) चेन्नई येथे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ करतील. दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज आहेत. तत्पूर्वी, या मालिकेसाठी भारतीय संघात निवड न झालेल्या युवा वेगवान गोलंदाज टी नटराजनने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मला ही विश्रांती गरजेची होती, असे त्याने म्हटले.

नटराजनने गाजवला ऑस्ट्रेलिया दौरा

युएई येथे झालेल्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस म्हणून नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, इतर खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. नटराजनने या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. या संपूर्ण दौर्‍यात प्रभावी कामगिरी करत त्याने कौतुक मिळवले होते.

विश्रांती गरजेची होती

नटराजनने एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड न झाल्याने मी तितकासा दुःखी नाही. घरच्या मैदानावर देशासाठी खेळण्याची संधी मिळाली नसल्याने मात्र काहीसा नाराज झालो. परंतु, मला विश्रांतीची गरज होती. मागील जवळपास सहा महिन्यांपासून मी कुटुंबाला वेळ दिलेला नाही. मला भारतासाठी सर्व प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे. त्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंट गरजेचे आहे. लॉकडाऊन दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंट केल्याचा फायदा मला झाला. आगामी काळात आणखी शारीरिक तंदुरुस्ती मिळवणे माझे लक्ष असेल.

ऐतिहासिक विजयाचा हिस्सा राहिला नटराजन

भारताने ऑस्ट्रेलिया जिंकलेल्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जिंकून देण्यात नटराजनने मोलाचा वाटा उचलला होता. ब्रिस्बेन येथे झालेल्या या कसोटीत पदार्पण करताना नटराजनने तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवले होते. त्याआधी, टी२० मालिकेतही तो सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होता. अष्टपैलू हार्दिक पांड्याने नटराजनच्या कामगिरीचे कौतुक म्हणून आपल्याला मिळालेला मालिकावीर पुरस्कार त्याला दिला होता.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौरा केला स्थगित

वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य

केकेआरचा शिलेदार नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---