PAK vs WI: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. आज दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर वेस्ट इंडिज संघाची अवस्था वाईट झाली आहे. पाकिस्तानी फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. यादरम्यान 38 वर्षीय पाकिस्तानी फिरकी गोलंदाज नोमान अलीने हॅटट्रिक घेत खळबळ उडवून दिली. नोमान अलीने त्याच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद करून इतिहास रचला आहे. अशाप्रकारे तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज ठरला.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ट इंडिजने 37 धावांच्या आत त्यांचे 4 विकेट गमावले. यानंतर 12 व्या षटकात नोमनने षटकाच्या पहिल्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हज, दुसऱ्या चेंडूवर टेविन इमलाच आणि तिसऱ्या चेंडूवर केविन सिंक्लेअरचे बळी घेतले. ग्रीव्हज आणि सिंक्लेअर झेलबाद झाले. बाबर आझमने दोन्ही खेळाडूंचे कॅच घेतले. दरम्यान, टेविन इमलाचला नोमान अलीने एलबीडब्ल्यू आउट केले. ग्रीव्हजने एक धाव घेतली पण इतर दोन फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. पहिल्याच डावात वेस्ट इंडिजची अवस्था बिकट झाली आहे. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील धावसंख्येबद्दल बोलयचे झाल्यास तर, संघाने 18 षटकांत फक्त 64 धावांत 8 विकेट गमावल्या आहेत.
NAUMAN ALI CREATED HISTORY…!!!!!
– Nauman Ali becomes the first Pakistani spinner to take the Hat-trick in Test Cricket History. 🤯 pic.twitter.com/kznBtl5BW5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 25, 2025
पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट इतिहासात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम 5 वेळा झाला आहे. नोमान अली यांच्यापूर्वी वसीम अक्रम, मोहम्मद सामी आणि नसीम शाह या गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटीत 2 हॅटट्रिक घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 43 गोलंदाजांनी 47 हॅटट्रिक घेतल्या आहेत. यापैकी फक्त 4 गोलंदाज असे आहेत. ज्यांनी 2 कसोटी हॅटट्रिक घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे ह्यू ट्रंबल आणि जिमी मॅथ्यूज हे प्रत्येकी दोन हॅटट्रिक घेणारे पहिले गोलंदाज होते. यानंतर, वसीम अक्रम आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांनी कसोटीत 2 हॅटट्रिक घेण्याचा मोठा टप्पा गाठला.
हेही वाचा-
सूर्यकुमार यादव सिक्सर किंग रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये प्रवेश करणार? करावा लागेल हा पराक्रम
‘देशांतर्गत स्पर्धा आयपीएलच्या बरोबरीची…’, वरुण चक्रवर्तीने त्याच्या यशाचे रहस्य उलगडले
IND VS ENG; संघ निवडीत मोठी चूक! दुखापतग्रस्त अभिषेक शर्माचा पर्याय भारताकडे नाही