मंगळवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयच्या बैठकीत येत्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यावर टी२०, वनडे व कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघात केवळ ७ खेळाडू असे आहेत, ज्यांना तिनही प्रकारात संघात संधी दिली आहे. यात २७ वर्षीय वेगवान गोलंदाज नवदिप सैनीचाही समावेश आहे.
भारतीय वनडे आणि टी२० संघांचा सदस्य असलेल्या सैनीला देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमध्ये नेत्रदिपक प्रदर्शन केल्याचा चांगला फायदा झाला असून त्याला वनडे व टी२०सह कसोटी संघातही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे कसोटी पदार्पणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
भुवनेश्वर कुमार व इशांत शर्माची या दौऱ्यावर दुखापतीमुळे निवड झालेली नाही. त्या दोघांची अनुपस्थिती मोहम्मद सिराज व नवदीप सैनीच्या पथ्यावर पडली आहे. दोघांनाही कसोटी संघात स्थान देण्यात आली आहे.
सैनी आयपीएल २०२०मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात बेंगलोरला विजय मिळवून देताना महत्त्वाची भूमिका निभावली आहे. २०१९पासून बेंगलोरचा सदस्य असलेल्या सैनीने आयपीएलमध्ये एकूण २४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण १६ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायंच झाल तर, ऑगस्ट २०१९ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सैनीने आतापर्यंत ९ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. तर डिसेंबर २०१९ला वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने पहिला वनडे सामना खेळला होता. तेव्हापासून त्याने एकूण ५ वनडे सामने खेळले असून ५ विकेट्सची कामगिरी केली आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज