प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. काल (२९ सप्टेंबर) पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात लढत झाली. पुणेरी पलटणसाठी करो या मरो अशी परिस्थिती होती. पण दबंग दिल्लीने ६०-४० असा विजय मोठा मिळवत सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित केला आणि पुण्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
दिल्लीच्या या यशात प्रमुख भूमिका ही नवीन कुमारची आहे. कालच्या सामन्यात नवीन कुमारने १९ रेड पॉइंट्स मिळवत प्रो कबड्डीमध्ये ४०० रेड पॉइंट्सचा पल्लाही पार केला.
प्रो कबड्डी सीजन ६ मध्ये पदार्पण करणाऱ्या नवीन कुमारने केवळ २ सीजन खेळतानाच ४०० रेड पॉइंट्सचा पल्ला पार केला आहे. त्यामुळे प्रो कबड्डीत जलद ४०० रेड पॉइंट्स मिळवण्याचा विक्रम आता नवीनच्या नावावर झाला आहे. नवीनने प्रो कबड्डीतील ४१ सामन्यात ४१३ रेड पॉइंट्स मिळवले आहेत.
नवीनने प्रो कबड्डीचा ७ वा सीजन सातत्यपूर्ण दमदार कामगिरीने गाजवला आहे. त्याने सीजन ७ मध्ये १९ सामन्यांत १८ सुपरटेन केले आहेत. तर तब्बल सलग १७ सुपरटेन केले आहेत. त्यामुळे सर्वाधिक सलग सुपर टेनचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
तसेच अजून दिल्लीचे ३ लीग सामने बाकी आहेत. एक सीजनमध्ये सर्वाधिक सुपरटेन परदीप नरवालच्या (१९ सुपरटेन) नावावर आहेत. त्यामुळे आता परदीप नारवालचा हा विक्रमही नवीन लवकरच मोडु शकतो.
दिल्लीने प्रो कबड्डीच्या या सीजनमध्ये बाद फेरीत प्रवेश केला असल्याने नवीन एक्सप्रेस असे टोपन नाव पडलेल्या नवीनकडून चाहत्यांना पुढेही अशाच मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.
प्रो कबड्डीमध्ये सर्वात जलद ४०० रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू –
नवीन कुमार – ४१ सामने
पवन शेरावत – ४१ सामने
मनिंदर सिंग – ४६ सामने
रोहित कुमार – ४७ सामने
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’
–‘शिवनेरी सेवा मंडळ’आयोजित कबड्डी स्पर्धाचा थरार आजपासून