क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र, सभ्य लोकांच्या या खेळात अनेकदा खेळाडूंमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून खटके उडाल्याचेही पाहायला मिळाले आहे. असेच काहीसे सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेतही घडले. आयपीएल 2023च्या 43व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात लखनऊचा खेळाडू नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाली. अशात नवीनचे या घटनेनंतर वक्तव्य समोर आले, ज्यात त्याने खळबळजनक भाष्य केले.
मैदानात विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen ul Haq) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हातमिळवणीदरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांशी बाचाबाची करताना व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये दिसत आहे. विराटचा स्वभाव सर्वांनाच माहितीये, पण नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) याच्याविषयी बोलायचं झालं, तर 2 वर्षांपूर्वीच्या एका घटनेनंतर त्याने केलेल्या वक्तव्यावरून समजते की, तो एवढा आक्रमक बनण्याचा प्रयत्न का करत आहे?
विराट कोहलीसोबत घडलेल्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवीनने मित्राशी म्हटले की, “मी भारतात आयपीएल खेळण्यासाठी आलो आहे, कुणाचेही अपशब्द ऐकण्यासाठी नाही.”
शाहिद आफ्रिदीशी झालेला वाद
नवीन-उल-हक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सन 2020मध्ये वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर आफ्रिदीने ट्वीट करत लिहिले होते की, “युवा खेळाडूंसाठी माझे एक मत आहे की, त्याने खेळ खेळावा, अपशब्दाचा प्रयोग करू नये.” त्यानंतर 23 वर्षीय खेळाडूने आपली भावना स्पष्ट केली होती.
‘मी मागे हटणार नाही’
शाहिद आफ्रिदीच्या ट्वीटनंतर नवीनने माध्यमांना सांगितले होते की, “जर कुणी मला काही म्हणत आहे, तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासूनच असा आहे. हे माझ्यात स्वाभाविकरीत्या आहे. जर मी म्हणालो की, जेव्हा कोणी मला काही म्हणेल, तर मी मागे हटणार नाही, तर हे खरंच होणार नाही. मी हे सांगू शकत नाही की, मी असे करणार नाही. हे माझ्या रक्तात आहे.”
नवीन उल हकची कामगिरी
या हंगामात नवीनने 4 सामन्यात गोलंदाजी करताना 14च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, लखनऊ संघही हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. लखनऊने बेंगलोरविरुद्धचा सामना गमावला असला, तरीही गुणतालिकेत लखनऊ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (naveen ul haq big statement after confronting virat kohli in lsg vs rcb ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊच्या पराभवानंतर दिग्गजाने राहुलला झापले; म्हणाला, ‘आधीच फलंदाजीला का आला नाही?’
कोण आहे नवीन उल हक? ज्याच्यामुळे विराट अन् गंभीरचं झालं भांडण, अफगाणिस्तानातून आयपीएलपर्यंत कसा आला?