पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीला फक्त १ वर्ष उरले आहे. तरीही पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची लढाई अजूनही सुरू आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू सिद्धू यांनी या लढ्यात विरोधी पक्षाकडून मिळणाऱ्या कौतुकालाच हत्यार बनवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये आम आदमी पार्टीच्या नेत्याने त्यांचे कौतुक केले आहे.
सिद्धू यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच दुसरीकडे हा सिद्धू यांचा मुख्यमंत्री अमरिंदर यांच्यावरील दबाव वाढवण्याचा गेम असल्याचे देखील म्हटले जात आहे.
सिद्धू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “आमचा विरोधी पक्ष आम आदमी पार्टीने (आप) माझे पंजाबसाठी केलेले काम आणि दृष्टी कायमच ओळखली आहे. २०१७ पासून शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, विज अशा अनेक समस्यांवर लढत सुरू असून पंजाबच्या जनतेने माझे काम पाहिले आहे, असे आपला वाटते. आज मी पंजाब मॉडेल सादर करत आहे. हे तर स्पष्ट आहे की, त्यांना माहीत आहे कोण पंजाबसाठी काम करत आहे.”(Navjot Singh Sidhu tweets for aap says opposition knows who is working for punjab)
Our opposition AAP has always recognised my vision & work for Punjab. Be it Before 2017- Beadbi, Drugs, Farmers Issues, Corruption & Power Crisis faced by People of Punjab raised by me or today as I present “Punjab Model” It is clear they know – who is really fighting for Punjab. https://t.co/6AmEYhSP67 pic.twitter.com/7udIIGkq1l
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 13, 2021
सिद्धु यांनी काही वेळानंतर पुन्हा एकदा ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी आपसोबत हात मिळवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी लिहिले की, “मला प्रश्न विचारण्याचे धाडस विरोधकांकडे आहे. परंतु लोकांबद्दलच्या माझ्या भावनांवर ते काहीही बोलू शकत नाहीत. याचा अर्थ त्यांनी स्वत:ला नशिबावर सोडले आहे.”
सुनील जाखड यांचे पद धोक्यात?
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वर्चस्वाच्या लढाईत पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्या खुर्चीचा बळी जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. कॉंग्रेस हाय कमांड पक्षाच्या पंजाब युनिटमध्ये मोठा फेरबदल करण्याची तयारी करत आहे. त्याचा ब्लू प्रिंट तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅप्टन अमरिंदर यांची खुर्ची अबाधित राहील आणि सिद्धू यांना समायोजित केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम वर्क! हातून चेंडू निसटल्याने ब्रावोने पायाने मारली किक, मग काय सहकारी ऍलेनने टिपला झेल
बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत विंडीजची विजयाची हॅट्रिक, नायक पूरन-गेलने केले भन्नाट सेलिब्रेशन
गंभीरने निवडला भारताचा सर्वकानिल कसोटी संघ, धोनीला दिली जागा; पण ‘याला’ बनवले कर्णधार