आयपीएलचा 17 वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाचा नारळ फुटणार आहे. तसेच या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी अर्थात रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार, संगीतकार आणि गायक सहभागी होणार आहेत.
याबरोबरच आयपीएलच्या 17 व्या हंगामात भारतीय संघाचा माजी खेळाडू नवजोत सिंह सिद्धू यांचं कॉमेंटेटर म्हणून पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. त्याआधी ब्रॉडकास्टर्सच्या खास कार्यक्रमात नवजोत सिंह सिद्धू यांची एन्ट्री झाली. यावेळेस अनेक प्रेझेंटेटर्सने त्यांचं स्वागत केलं. तसेच सिद्धू यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात शायरीने सुरुवात केली आहे. तसेच सिद्धू यांनी आतापर्यंत अनेकदा शेरोशायरी आणि खास शैलीत कॉमेंट्री केली आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांचा हाच अंदाज आवडत असतो.
नवजोत सिंह यांची क्रिकेट कारकीर्द ही 15 वर्षांची राहिली. सिद्धू यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 51 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. सिद्धू यांनी 51 सामन्यांमध्ये 1 द्विशतक आणि 9 शतकांसह 3 हजार 202 धावा केल्या. तसेच 136 वनडे मॅचेसमध्ये 4 हजार 413 धावा केल्या आहेत. तसेच सिद्धू यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर 2001 साली समालोचक म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2004 साली त्यांनी राजकीय खेळीला सुरुवात केली. सिद्ध 2004 साली भाजपसह जोडले गेले होते.
Navjot Singh Sidhu is back for the IPL. 🔥pic.twitter.com/PxOdddUuWC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 22, 2024
दरम्यान, सिद्धू यांनी छोट्या पडदा गाजवला. सिद्धू बिग बॉस, द कपिल शर्मा शो, लाफ्टर चॅलेंज, एक्स्ट्रा इनिंग विथ टी 20 यासारखे कार्यक्रम गाजवले. त्यानंतर आता सिद्धू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा सामना असणार आहे. या सामन्यासाठी एका बाजूला क्रिकेट चाहत्यांमध्ये तिकीटासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 पूर्वी सरफराज आणि मुशीरला मिळाली खास भेट, घ्या जाणून…
- आयपीएलच्या 17 व्या हंगामात होणार दमदार उद्घाटन सोहळा, रंगारंग कार्यक्रमात कोण लावणार हजेरी?