सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल 2023) आयोजन केले आहे. या लीगच्या उद्घाटनाच्या दिवशी मोठा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी एक मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनेक पदे भूषवलेल्या शरद पवार यांचे नाव गहुंजे येथील एमसीए स्टेडियमला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
पद्मविभूषण आदरणीय @PawarSpeaks साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एमसीएचे अध्यक्ष आमचे बंधू आ. @RRPSpeaks दादांकडे… pic.twitter.com/Ucag2XFlTf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 16, 2023
धनंजय मुंडे यांनी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले,
‘पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एमसीएचे अध्यक्ष आमचे बंधू आ. रोहित दादा पवार यांच्याकडे केली आहे. आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल दादांचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन!’
शरद पवार यांचा क्रिकेट जगताशी अत्यंत नजीकचा संबंध असल्याचे दिसून येते. त्यांनी अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन व बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे.
(NCP Leader Dhananjay Munde Want NCP President Sharad Pawar Name To MCA Stadium Wrote Letter To MCA President Rohit Pawar)
महत्वाच्या बातम्या –
MPL: थरारक सामन्यात नाशिक टायटन्सचा विजय, छत्रपती संभाजी किंग्सचे प्रयत्न पडले तोकडे
ऍशेससाठी आयपीएल न खेळणारा संघातून बाहेर! ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया