एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. संघांनी येथे सुरु असलेल्या ऍस्पायर चषक 2023 फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौघांच्या कामगिरीतील फरक म्हणजे एनडीए आणि सिटी एफसी संघाला विजयासाठी शूट-आऊटपर्यंत झुंजावे लागले.
पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत दुर्गा एस.ए. संघाने आक्रमक खेळ करताना राहुल एफ.ए. संघाचा 3-1असा पराभव केला. नीरज माने आणि नेल्सन पास्ते यांनी पाठोपाठच्या 11 आणि 12व्या मिनिटाला गोल करून दुर्गा संघाला आघाडीवर नेले. पूर्वार्धात राहुल एफ.ए.च्या गणेश पाटीलने 24व्या मिनिटाला गोल करून गोलफरक कमी केला. मात्र, उत्तरार्धात त्यांना आणखी यश आले नाही. त्याऊलट रॉनी रोझारियोने 36व्या मिनिटाला गोल करून दुर्गा संघाला आघाडीवर नेले. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब संघाला नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर अशोका इलेव्हनवर शूट-आऊटमध्ये 4-3 असा विजय शक्य झाला. नियोजित वेळेत रवी किरणने 12व्या मिनिटाला अशोका इलेव्हनला आघाडीवर नेले होते. त्यांचा आनंद सातच मिनिटे टिकला. सुधीर कुमारने 19व्या मिनिटाला एनडीए संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अखेरपर्यंत ही गोलबरोबरीची कोंडी सुटू शकली नाही. शूट-आऊटमध्ये एनडीएसाठडी रितेश ठाकूर, अजेश सी.ए., संदीप सिंग, आशिष कोहली यांनी गोल केले. अशोका संघाकडून श्रीराग व्ही. आर., प्रसाद भंडारी, श्रीकांत महाडिक यानांच जाळीचा वेध घेता आला.
सिटी एफसी पुणे वि. सांगवी एफसी हा सामनाही शूट-आऊटमध्येच निकाली लागला. नियोजित वेळेत गोलशून्यची बरोबरी अखेरपर्यंत सुटू शकली नाही. शूट-आऊटमध्ये लिलत पाटील, प्रितेश बाबर, सात्विक नायक, व्हिकी सिंग यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. सांगवी संघाकडून ऋत्विक एम., फाहेद खान, संदन नानेक यांनाच गोल करता आले. सिटी एफसीने सामना 4-3 असा जिंकला.
अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीत संगम यंग बॉईंज संगाने 13व्या मिनिटाला विपुल गोफाणेने नोंदविलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर संगम यंग बॉईज संघाने पुणेरी वॉरियर्सवर 1-0 असा विजय मिळविला.
निकाल (सर्व उपांत्यपूर्व फेरी)
दुर्गा स्पोर्ट्स अकादमी 3 (नीरज माने 11वे, नेल्सन पास्ते 12वे, रॉनी रोझारियो 36वे मिनिट) वि.वि. राहुल फुटबॉल अकादमी 1 (गणेश पाटील (24 वे मिनिट()
एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब 1 (4) (सुधीर कुमार 19वे मिनिट, रितेश ठाकूर, अजेश सी.ए., संदीप सिंग, आशिष कोहली) वि.वि. अशोका इलेव्हन 1 (3) (रवी किरंण 12वे मिनिट, श्रीराग व्ही. आर., प्रसाद भंडारी, श्रीकांत महाडिक)
सिटी एफसी पुणे 0 (4) (ललित पाटील, प्रितेश बाबर, सात्विक नायक, विकी सिंग) वि.वि. सांगवी फुटबॉल क्लब ब 0 (3) (ऋत्विक एम., फाहेद खान, संधान नाणेकर)
संगम यंग बॉईज ब 1 (विपुल गोफाणे 13वे मिनिट) वि.वि. पुणेरी वॉरियर्स 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
सांगवी एफसी ब, पुणे वॉरियर्सचा संघर्षपूर्ण विजय, तर अशोका इलेव्हनसह दुर्गा एसएही उपांत्यपूर्व फेरीत
ऍस्पायर चषक २०२३ । सिटीएफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्टस क्लब, संगम बॉईज उपांत्यपूर्व फेरीत