भारताची सलामीवीर पूनम राऊतने महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना दणदणीत शतक केले आहे. पूनमचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आज खेळताना तिने १३६ चेंडूत १०६ धावा केल्या .
आजप्रमाणेच इग्लंड विरूध्द झालेल्या पहिल्याच सामन्यात तिने ८६ धावांची उत्तम खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. पूनम राऊत हिने आतापर्यंत ४९ एकदिवसीय सामन्यात १३५७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यात तिची सरासरी ३८.४० आहे.
ह्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पूनम सध्या ५व्या स्थानावर आहे. तिने ६ सामन्यांत २७१ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व एक अर्धशतकाचा समावेश आहे.