पाकिस्तान पुरूष क्रिकेट संघ नेदरलॅंड्सच्या (NEDvsPAK) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहेत. यातील पहिला सामना पार पडला असून पाकिस्तानने विजयी सुरूवात केली आहे. त्यांनी पहिला सामना १६ धावांनी जिंकत यजमानांना धूळ चारली आहे. या सामन्यात पाकिस्तानने ३००च्या पार अशी मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना नेदरलॅंड जिंकेल अशी आशा असताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्यातील हॅरिस रऊफची गोलंदाजी जबरदस्त ठरली आहे. त्याने वेस्ले बेरेसीला ज्याप्रकारे बाद केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला होत आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदांज हॅरिस रऊफ याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने १० षटकात ५१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने सामन्याच्या ५व्या षटकात वेस्ले बेरेसी याला त्रिफळाचीत केले. त्याने टाकलेला चेंडू फलंदाज सोडण्याच्या तयारीत होता मात्र तो चेंडू ज्या पद्धतीने आता येत त्याचा स्टम्प उडला हे पाहण्यासारखे होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/hazharoon/status/1559539012548820994?s=20&t=CGjQWzMCXWliAABq_Lh2Jw
नाणेफेक जिंकत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने प्रथम फलंदाजी केली. इमाम उल हक लवकरच तंबूत परतला. नंतर फखर जमान याने बाबर सोबत दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी केली. जमानने १०९ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याचे हे वनडेतील ७वे शतक ठरले. तर बाबरनेही ७४ धावा केल्या. शाबाद खानने २८ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. यामुळे पाकिस्तानने ५० षटकात ६ विकेट्स गमावत ३१४ धावासंख्या उभारली.
प्रत्युत्तरात नेदरलॅंड्सने ८ विकेट्स गमावत २९८ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाबाद ७१ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त विक्रमजीत सिंग आणि टॉम कूपर यांनी प्रत्येकी ६५-६५ धावा केल्या. मात्र पाकिस्तानी गोलंदाजीपुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
पाकिस्तानकडून वनडेत पदार्पण करणाऱ्या नसीम शाह याने ६७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या सामन्याचा सामनावीर फखर जमान ठरला. तर या वनडे मालिकेतील दुसरा सामना १८ ऑगस्टला खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दीपक चाहरचे पुनरागमन सोपे नसेल’ माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी
धोनीचा सिक्स अन् भारतानं जिंकला पहिला टी-२० आशिया कप, रोहितही अशाच कामगिरीसाठी उत्सुक
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स