टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सलग सहावी उलटफेर पाहायला मिळाली. रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) टी20 विश्वचषकात सुपर 12 फेरीतील 40वा सामना नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात नेदरलँड्स संघाने 13 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाला स्पर्धेतून बाहेर काढले. या संघासमोर दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी खूपच कमकुवत दिसली. या पराभवानंतर कर्णधार टेंबा बावुमा खूपच निराश झाला. त्याने सामन्यानंतर कॅमेऱ्याकडे न पाहताच आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला बावुमा?
ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध पराभव पचवणे कठीण असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) याने सांगितले. तो म्हणाला, “हा पराभव पचवणे कठीण आहे, यामुळे आम्ही खूपच निराश झालो आहोत. आम्हाला माहिती होते की, हा करो वा मरो सामना होता. या महत्त्वाच्या सामन्यात आम्ही सामना गमावला. दुर्दैवीरीत्या आम्ही महत्त्वाच्या क्षणी कमी पडलो. आम्हाला प्लेऑपमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्वत:वर विश्वास होता. दुर्दैवीरीत्या आम्ही ते करू शकलो नाही. विरोधी संघांने नाणेफेक जिंकणे आणि गोलंदाजी करणे आमच्या विरोधात झाले. आम्ही महत्त्वाच्या क्षणी विकेट्स गमावल्या. त्यांनी आमच्या तुलनेत मैदानाचा चांगला वापर केला.”
WHAT A WIN! 🤩
Netherlands defeat South Africa in their final Group 2 match of #T20WorldCup#SAvNED |📝: https://t.co/4UJVijHlTA pic.twitter.com/zhmHSOpqVe
— ICC (@ICC) November 6, 2022
विशेष म्हणजे, या टी20 विश्वचषकात बावुमाने खराब प्रदर्शन केले आहे. मात्र, त्याने स्वत:ला नाही, तर नाणेफेकीला पराभवास जबाबदार म्हटले. हे निश्चितरीत्या चाहत्यांनाही हैराण करणारे होते.
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारताला फायदा
खरं तर, टी20 विश्वचषकात नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सने 13 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील प्रवास संपुष्टात आला. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघाच्या 5 सामन्यांमध्ये फक्त 5 गुण राहिले. त्यांचा नेट रनरेट घसरून +0.864 इतका झाला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघ बाहेर होताच भारतीय संघ उपांत्य सामन्यात पोहोचला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉस जिंकत भारताचा बॅटिंगचा निर्णय, दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला मिळाली संधी
गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! बांगलादेशला नमवत पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये एन्ट्री