---Advertisement---

‘यो तेरे बाप का घर कोणी, थाणा है, चुपचाप खडा रह’, नीरजने बिग बींना शिकवली हरियाणवी- VIDEO

On: शनिवार, सप्टेंबर 18, 2021 1:48 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुपर्णपदक जिंकलेला नीरज चोप्रा आणि भारतीय हाॅकी संघाचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश हे दोघे शुक्रवारी (१७ सप्टेंबर) कौन बनेगा करोडपति या कार्यक्रमात पोहोचले होते. दोघांनी टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल कार्यक्रमाचे होस्ट आणि बिग बी या नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात नीरजने अमिताभ यांना हरियाणवी भाषाही शिकवली आहे. तसेच त्यांच्या चित्रपटातील डायलाॅगही त्याने म्हटले आहेत.

मुळचा पानीपतचा असणाऱ्या नीरज चोप्राने कार्यक्रमात अमिताभ यांना हरियाणवी भाषा शिकवली आहे. नंतर त्याने अमिताभ यांच्याच चित्रपटातील डायलाॅग हरियाणवीमध्ये बोलायला लावला होता. अमिताभ यांनीही हरियाणा भाषेमध्ये डायलाॅग म्हणताच, सर्व प्रेक्षक हसू लागले.

हाॅकी संघाचा गोलकीपर श्रीजेशने कार्यक्रमादरम्यान अमिताभ यांना म्हटले की, “आज आम्ही दोघे तुम्हाला हरियाणवी शिकवणार.” श्रीजेशचे हे वाक्य ऐकताच अमिताभ घाबरले आणि म्हणाले की, “हे भगवान.”

मग पहिल्यांदा नीरज चोप्रा अमिताभ यांना त्यांचा चित्रपट जंजीरमधील एक डायलाॅग हरियाणवी भाषेत बोलायला लावतो. हा डायलाॅग तो स्वत: पहिल्यांदी एकदा बोलून दाखवतो. “यो तेरे बाप का घर कोणी, थाणा है, चुपचाप खडा रह.” त्यानंतर अमिताभही हा डायलाॅग जसाच्या तसा म्हणतात.

दुसऱ्या वेळी नीरज एक दुसरा डायलाॅग बोलतो. “मै आज भी फेंके हुए पैसे ना ठाता.” अमिताभही हरियाणवीमध्ये हा डायलाॅग बोलण्याचा प्रयत्न करतात.

https://www.instagram.com/p/CT3QEbeqHID/?utm_source=ig_web_button_share_sheet

त्यानंतर अमिताभ यांनीही नीरजची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि नीरजला हिंदीमधील डायलाॅग हरियाणा भाषेमध्ये बोलायला लावला. ते नीरजला, “कभी कभी मेरे दिल मे ख्याला आता हे..” या डायलाॅगला हरियाणवीमध्ये बोलायला लावतात. नीरजही पूर्ण डायलाॅग हरयाणवीमध्ये म्हणतो. त्यांचा हा मजेशीर संवादाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बीसीसीआयची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय प्रशिक्षकाचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव

आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे

‘थाला’चा सराव सत्रात धूमधडाका, ठोकला कडक हेलिकॉप्टर शॉट; मुंबईकरांची वाढली असेल धडधड!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---