---Advertisement---

‘माझी वक्तव्ये वाईट अजेंडासाठी वापरु नका’, त्या वादामुळे भारताचा ‘गोल्डन बॉय’ भडकला; वाचा सविस्तर

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 7:37 AM
---Advertisement---

जपानची राजधानी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले ॲथलेटिक्स सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमच्या माध्यमातून त्याने मीडिया आणि चाहत्यांना फटकारले आहे. ऑलिम्पिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नीरज चोप्राने हा राग व्यक्त केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत नीरजचा भाला घेऊन जाताना दिसत आहे. जेव्हा नदीम नीरज जवळ पोहचतो, तेव्हा तो आपला भाला घेऊन थ्रो करण्यासाठी परत जातो.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूविरोधात राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या भावना चुकीच्या आहेत, असे म्हटले आहे.

लोक माझे नाव घेऊन घाणेरडा अजेंडा करत आहेत
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नीरजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि सोशल मीडियावर नदीमच्या विरोधात जे काही चालले आहे, त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नीरजने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, “माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, माझी वक्तव्ये तुमच्या वाईट अजेंडाला पुढे वाव मिळण्यासाठी वापरु नका. खेळ आपल्याला सर्वांना एकत्र राहण्यास शिकवतो आणि काहीही बोलण्यापूर्वी खेळाचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”

नीरज व्हिडिओमध्ये म्हणाला की, “माझ्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत दिलेले विधान चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे आणि लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिलेली प्रतिक्रिया अतिशय निराशाजनक आहे.”

नदीम नियमात राहून काम करत होता
त्याच्या व्हिडिओमध्ये नीरज म्हणत आहे की, आपल्या सर्वांच्या खेळाडूंचे वैयक्तिक भाले आहेत. परंतु, नियमांनुसार कोणीही कोणाचाही भाला वापरू शकतो. हा नियम आहे आणि नदीम फक्त माझ्या भाल्यासह सराव करत होता. त्यात काहीही चुकीचे नाही.

या दरम्यान, त्यानी सर्व लोकांच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. परंतु, त्याचबरोबर त्यांनी लोकांना विनंती केली आहे की, ‘माझ्या विधानाची मदत घेऊन कोणाविरुद्ध दुखावणारे वक्तव्य करू नका आणि अनावश्यकपणे हा मुद्दा उपस्थित करू नका.

मुलाखतीनंतर बनला मुद्दा
उल्लेखनीय म्हणजे, नदीम आणि नीरज व्हिडिओ, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक मोठा मुद्दा बनला आहे. एका मुलाखतीदरम्यान नीरजने सांगितले की त्याने घाईत पहिला थ्रो का फेकला. नीरजने सांगितले की, त्याचा भाला नदीमकडे होता ज्याला मिळण्यास वेळ लागला आणि यामुळे तो घाईघाईत भाला फेकताना दिसला.

https://twitter.com/Soumyadipta/status/1430545891560026117

तो म्हणाला होता, “ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासून मी माझा भाला शोधत होतो. मग मला माझ्या समोर नदीम दिसला जो माझा भाला घेऊन चालत होता. मग मी त्याला सांगितले की भाऊ, हा माझा भाला आहे, मला दे. मला त्याला थ्रो करायचे आहे.” त्यावेळी त्याला नदीमने तो भाला दिला आणि म्हणूनच त्याने पहिला थ्रो घाईत फेकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोलार्डच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण, पत्नीसाठी शेअर केली प्रेमळ पोस्ट; कृणालच्या वाईफनेही दिल्या शुभेच्छा

‘थाला’चे व्हॉलीबॉलमध्ये जादुई प्रदर्शन, पाहा कसे हवेत झेप घेत मारले दमदार स्मॅश

‘पांड्या बंधूं’ची अबु धाबीमध्ये धमाकेदार एन्ट्री, लग्जरी कारमधून मुंबई इंडियन्सच्या हॉटेलमध्ये पोहोचले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---