भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मागच्या महिन्यात ग्रोईन म्हणजेच मांडीची दुखापत झाली होती. आता विश्रांतीनंतर तो या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. आता २६ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आता नीरज पूर्णपणे फिट आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमधील लुसाने शहरात खेळली जाणार आहे.
लुसाने शहरात चांगले प्रदर्शन केले, तर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ज्यूरिक शहरात होणाऱ्या डायमंड लीगच्या (Diamond League) अंतिर फेरीत जागा पक्की करू शकतो. कारण तो सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत पहिल्या सहा क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंना ज्यूरिखामध्ये होणाऱ्या अंतिम फेरित संधी मिळणार आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या यूजीनमध्ये २४ जुलै रोजी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्या रौप्य पदक जिंकले. या अंतिम फेरीदरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. याच कारणास्तव बर्मिंघममध्ये खेळल्या गेलेल्या कॅमनवेल्थ गेम्समधूनही त्याने माघार घेतली होती.
दुखापतीनंतर मेडिकल टीमने त्याला चार आठवड्यांची विश्रांती सांगितली होती. कॉमनवेल्थ गेम्स २८ जुलैपासून सुरू झाल्या असून त्याच्या दोन दिवस आधी चोप्राने या स्पर्धेतून माघार घेतली होती. आता तो जर्मनीमध्ये रिहॅबिलिटेशन कालावधी पूर्ण करून घरी परतला आहे. चोप्राने अधिकृत ट्वीटर खात्यावरून स्वतःच्या फिटनेसची माहिती दिली. त्याने लिहिले की, “मजबूत आणि शुक्रवार (२६ ऑगस्ट) साठी तयार असल्यासारखे वाटत आहे. समर्थन करण्यासाठी सर्वांचे आभार. लुसानेमध्ये भेटुयात”
Feeling strong and ready for Friday. Thanks for the support, everyone.
See you in Lausanne! @athletissima pic.twitter.com/wx52umcVtm— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 23, 2022
आयोजकांनी जेव्हा १७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची यादी जाहीर केली, तेव्हा चोप्राचे नाव देखील यामध्ये सामील केले गेले होते. स्पर्धेत तो खेळणार की नाही, याविषयी शंका व्यक्त होत होत्या. पण आता त्याने स्वतः याविषयी पुष्टी केली आहे. भारतीय एथलेटिक्स असोसिएशनचे अक्ष्यक्ष आधिले सुमारिवाला याविषयी बोलताना म्हणाले की, तो फिट असेल तर लुसानेमध्ये स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
३० जूल रोजी स्टॉकहोममध्ये खेळताना दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या चोप्रा सध्या सात गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला चेक रिपब्लिकचा युकुब वादलेच २० गुणांसह डायमंड लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जर्मनीचा जूलियन वेबरकडे १९ गुण आहेत, तर ग्रेनाडाच्या एंडरसन पीटर्सकडे १६ गुण आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शाहिद आफ्रिदीकडून ही अपेक्षा नव्हती! भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बरळला असे काहीतरी
बाबर इथं शतक हाणून बसलाय अन् विराटला साधा सिक्स मारायला जमंना!
तब्बल १९ वर्षांनंतर झिम्बाब्वे करणार ‘या’ बलाढ्य देशाचा दौरा! संघ केला जाहीर