भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने मागील आठवड्यात बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले. त्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीम हा दुसऱ्या स्थानी राहिला. या दोघांच्या मैत्रीबद्दल व स्पर्धेबद्दल नीरज याच्या आईने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
जागतिक विजेता बनल्यानंतर नीरज याच्या आईची काही प्रसारमाध्यमांनी मुलाखत घेतली. यावेळी एका पत्रकाराने तुमच्या मुलाने पाकिस्तानच्या खेळाडूला हरवल्याचा वेगळा आनंद झाला का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना नीरजच्या आई म्हणाल्या,
“प्रत्येक जण मैदानात खेळण्यासाठी येत असतो. कोणाला एकाला जिंकायचे असते. तो पाकिस्तानी असला काय आणि भारतीय असला काय याने जास्त फरक पडत नाही. अर्शद जिंकला असता तरी मला आनंद झाला असता.”
अर्शद व नीरज हे वेगवेगळ्या देशांचे असले तरी घट्ट मित्र आहे. तिची मैत्री मागील चार वर्षांपासून असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेनंतर नीरज व अर्शद एकत्रितपणे भारताचा झेंडा घेऊन जाताना दिसलेले. सध्या नीरज जागतिक विजेता असला तरी झुरिख डायमंड लीगमध्ये त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
(Neeraj Chopra Mothers Big Statment On Pakistani Javelin Thrower Arshad Nadeem)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य