Neeraj Chopra Net Worth : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे 26 जुलैपासून ऑलिंपिक खेळांना सुरुवात होत आहे. यावेळी स्पर्धेत भारताचे 111 खेळाडूंचे पथक सामील होतेय. टोकियो येथे झालेल्या 2021 ऑलिंपिकमध्ये भारताला सात पदके मिळाली होती. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने देशासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकलेले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये देखील देशाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, असे असताना नीरज हा मैदानाबाहेर कशी लक्झरी लाईफ जगतो? हे आपण पाहूया.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे दिसते. पूर्वी फारसा परिचित नसलेल्या नीरज याची आता सोशल मीडियावर मोठी क्रेझ दिसून येते. त्याच्या वार्षिक कमाईचा विचार केल्यास ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सन 2023 च्या आकडेवारीनुसार, तो 30 ते 35 कोटींचा मालक आहे. हीच आकडेवारी 2020 मध्ये आठ कोटींच्या आसपास होती. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला खेलरत्न पुरस्कार देखील मिळाला होता.
नीरजचे हरियाणाच्या पानिपत येथे तीन मजली लक्झरी घर आहे. ही त्याची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते. याशिवाय त्याच्याकडे महागड्या कार आणि बाईक देखील आहे. सध्या त्याच्याकडे जवळपास एक कोटींच्या किमतीची मस्टंग कार असून, त्याने याआधी रेंज रोवर स्पोर्ट्स ही जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांची कार विकत घेतली होती. त्याच्याकडे असलेल्या दुचाकींमध्ये हर्ले डेव्हिडसन 1200 रोडस्टार ही तब्बल 11 लाख रुपयांची सर्वात महागडी दुचाकी आहे.
नीरज याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून, भारताला ऑलिंपिक इतिहासात पहिल्यांदाच ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून दिले होते. याआधी मिल्खा सिंग व पीटी उषा हे चौथ्या क्रमांकावर राहिलेले. त्यामुळे भारताला ऍथलेटिक्समधील पहिले पदक मिळवण्यासाठी तब्बल एका शतकाची वाट पाहावी लागली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!
आश्चर्यकारक! षटकार मारल्यानंतर खेळाडूला केलं बॅन, क्रिकेटमध्ये हा कुठला आगळा-वेगळा नियम
मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड