गतवर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पक २०२० (Tokyo Olympics) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. तर नीरज चोप्राने (Neeraj chopra) कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. त्याने या स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. तब्बल १२१ वर्ष वाट पाहिल्यानंतर पहिल्यांदाच ऍथलेटीक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले होते. या कामगिरीनंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. आता या पुरस्कारात आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे.
गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राला लॉरियस पुरस्कारासाठी (Laureas award) नामांकन मिळाले आहे. यामध्ये ६ खेळाडूंचा समावेश आहे. पोलंडचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोस्की, सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी यांनाही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
विश्वातील प्रमुख क्रीडा पत्रकार आणि प्रसारकांच्या १३०० पेक्षा अधिकच्या पॅनेलने यावर्षीच्या लॉरीयस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारासाठी ७ श्रेणींमध्ये खेळाडू आणि संघांची निवड केली आहे. विजेत्यांची घोषणा एप्रिलमध्ये लॉरीयस वर्ल्ड स्पोर्ट्स ॲकेडमीमध्ये केली जाणार आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा तिसरा भारतीय खेळाडू
नीरज चोप्रा लॉरीयस पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट (vinesh phogat) आणि माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. सचिन तेंडुलकरला २०००-२०२० चा लॉरीयस स्पोर्टिंग मुमेंटचा पुरस्कार मिळाला होता. २०११ मध्ये भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तो क्षण सर्वात खास क्षण होता.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत झालेल्या भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भाला फेकला होता. ऑलिम्पिकसह त्याने ६ मोठ्या स्पर्धांमध्ये देखील पदक मिळवले आहे. त्याने २०१८ मध्ये जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा, गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल खेळ, २०१७ मध्ये आशियाई चॅम्पियनशिप, २०१६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, २०१६ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर २०१६ मध्ये त्याने ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते.
महत्वाच्या बातम्या :
U19 वर्ल्डकप: ‘यंग इंडिया’चा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; सलग चौथ्यांदा केला अंतिम फेरीत प्रवेश
भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स
कडक! आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनपूर्वी ‘थाला’ने घेतली ‘अपिरिचित’ची भेट; फोटो भन्नाट व्हायरल