---Advertisement---

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची झाली ‘फँटॅस्टिक पंत’सोबत भेट; पाहा खास फोटो

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 12:32 AM
neeraj and pant
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) आणि मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा (neeraj chopra) यांची नुकतीच भेट झाली. या दोघांनी एकत्र एक फोटोशूट केला आहे, त्यानिमित्ताने दोघे भेटले. ही दोघांची एकमेकांसोबत पहिलीच भेट आहे. अशात दोघांनीही स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून फोटो शेअर करत याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

नीरज चोप्राने मागच्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सर्वात लांब भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला. रिषभ पंतसोबत झालेल्या भेटीची माहिती चाहत्यांना देण्यासाठी सर्वप्रथम नीरजने स्वतःच्या ट्वीटर खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये नीरजने लिहिले की, ‘जेव्हा तुमच्या सारखे मित्र असतील, तर कॅमेऱ्याला सामोरे जाताना सर्वकाही सोपे होऊन जाते. रिषभ पंतसोबत अशाप्रकारे मस्ती केली.’

नीरज चोप्राची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. चाहते त्याच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अशात रिषभ पंतनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रिषभ पंतने नीरज चोप्राची ट्वीटर पोस्ट रिट्वीट केली आणि खास प्रतिक्रिया नोंदवली. रिट्वीट करताना रिषभने लिहिले की, ‘तू पहिल्यापासूनच प्रो आहे नीरज… सरावासाठी शुभेच्छा, आशा आहे लवकरच पुन्हा भेटू.’

पंतने रिट्वीट केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेविषयी चाहत्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करून विचारले की, ‘रिषभ भैया तुझे पुढचे शतक कधी पाहायला मिळणार ? वेस्ट इंडीजविरुद्ध माझ्याच शहरात सामने होणार आहेत. शतक मारल्यावर मजा येईल.’

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. चाहत्यांना या आगामी मालिकेविषयी उत्सुकता लागून आहे. रिषभ पंतकडून या मालिकेत चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिक अहमदाबाद शहरात होईल, तर टी२० मालिका कोलकातामध्ये होईल.

नीरजने मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. त्याच्या या कामगिरीसाठी भारत सरकारकडून त्याला प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच परम विशिष्ट सेवा मेडलनेही दिले गेले.

महत्वाच्या बातम्या –

‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ

जयपुरची पटनाला पटखनी! नोंदवला ५१-३० असा दणदणीत विजय

देशातील सर्वात सुंदर स्टेडियमचे होणार लवकरच उद्घाटन; पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये झाला खुलासा

व्हिडिओ पाहा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---