टोकियो ऑलिंपिक्स (Tokyo Olympics) मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्यासाठी येता प्रजासत्ताक दिवस (Republic Day) खूप विशेष असणार आहे. या दिवशी गोल्डन बॉय नीरजला परम विशिष्ट सेवा मेडल (Param Vishisht Seva Medal) ने गौरविण्यात येणार आहे.
नीरज भारतीय सैन्यदलात सुभेदार म्हणून कार्यरत आहे. तो ४ राजपूताना रायफल्समध्ये सुभेदारपदी काम पाहातो. सैन्यात असताना त्याने चांगले काम करत विशिष्ट सेवा मेडल जिंकले आहे. यानंतर आता ऑलिंपिकमध्ये अतुलनीय प्रदर्शनासह घवघवीत यश साध्य केल्यानंतर त्याला परम विशिष्ट सेवा मेडल दिले जाणार आहे.
काय आहे परम विशिष्ट सेवा मेडल?
परम विशिष्ट सेवा मेडल हा भारतातील एक सैन्य पुरस्कार आहे. या पुरस्काराची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली होती. हा पुरस्कार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि सेवा क्षेत्रात सर्वांपेक्षा असाधारण काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
व्हिडिओ पाहा- नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
हरियाणा सरकारही करणार नीरजचा सन्मान
प्रजासत्ताक दिनी हरियाणा सरकारद्वारेही नीजरचा सन्मान केला जाणार आहे. हरियाणा सरकारच्या माहिती, जनसंपर्क आणि भाषा विभागाने ट्वीट करून सांगितले होते की, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमधील झांकीमध्ये राज्याची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी दाखवणार आहोत. या झांकीत नीरज चोप्राचा मोठा पुतळा बनवला जाईल.
ट्वीटमध्ये लिहिले गेले आहे की, “२६ जानेवारीच्या परेडमध्ये यावर्षी हरियाणाची झांकी सामील होईल. १० ऑलिम्पियन झांकीमध्ये सहभागी असतील. नीरज चोप्राची प्रतिकृती त्याचे मुख्य आकर्षण असेल. आज दिल्लीत झांकी अधिकृतपणे सादर होणार आहे. ही झांकी माहिती, जनसंपर्क आणि भाषा विभागाने तयार केली आहे.”
नीरज जगातील सर्वश्रेष्ठ भालाफेकपटू बनण्यासाठी घेतोय मेहनत
दरम्यान, भारताला २०२१ ऑलिम्पिकमध्ये इतिहासातील दुसरे सुवर्ण पदक जिंकवून देण्यासाठी नीरज चोप्राने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचा विचार केला, तर त्याने यापूर्वी ८८.०७ मीटर भाला फेकला आहे. असे सांगितले जात आहे की, एवढ्या चांगल्या प्रदर्शनानंतर त्याचे पुढचे लक्ष ९० मीटर भाला फेकणे आहे. जर नीरजने ९० मीटरचा टप्पा पार केला, तर तो भालाफेकमधील जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेटमध्ये शाकिब अल हसनचा मोठा कारनामा!! ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच
टीम इंडियाकडून ‘या’ चुका पुन्हा घडल्या, तर आगामी विश्वचषक विजेतेपदही राहू शकते दूर; वाचा सविस्तर
“गांगुली, द्रविड आणि कुंबळे विश्वचषक जिंकलेत का?” विराटला लक्ष करणाऱ्यांना दिग्गजाचा प्रतिप्रश्न
हेही पाहा-