भारताच्या ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. त्यानं गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. मात्र या ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. आता नीरजनं रौप्य पदक जिंकल्यानंतर एक मोठा खुलासा केला आहे.
नीरज चोप्रानं सांगितलं की, या ऑलिम्पिकमध्ये तो दुखापतीसह खेळत होता. नीरजनं हे देखील सांगितलं की त्याला सर्जरी करण्याची गरज भासू शकते. नीरजनं म्हणाला की त्याला ग्रोइन इंजरी आहे आणि यावर तो डॉक्टरांचा सल्ला घेईल. किंबहुना त्याच्यावर सर्जरी करण्याची देखील वेळ येऊ शकते.
विशेष म्हणजे, नीरजनं रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याच्या आईनं देखील दुखापतीची बाब बोलून दाखवली होती. नीरजच्या आईनं सांगितलं की, तो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याचं रौप्य पदक सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानं 89.45 मीटर भाला फेकला, जो त्याचा हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्ण पदक जिंकलं. त्यानं 92.97 मीटर लांब भाला फेकला. हा एक नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे. तर ग्रेनाडाच्या ॲंडरसन पीटर्सनं कांस्यपदक पटकावलं. त्यानं 88.54 मीटर भाला थ्रो केला.
फायनलमध्ये नीरज चोप्रा थोडा दबावात वाटला. अर्शदनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच 92.97 मीटर भाला थ्रो केला होता. नीरजला सुवर्ण जिंकण्यासाठी त्यापेक्षा जास्त लांब थ्रो करणं गरजेचं होतं. नीरजनं आपल्या कारकिर्दीत एकदाही 90 मीटर पेक्षा लांब थ्रो केलेला नाही. फायनलमध्ये त्याच्याकडून तब्बल 4 फाऊल झाले. नीरजची दुखापत हे या मागचं कारण असू शकतं.
हेही वाचा –
“तो पण माझ्या मुलासारखाचं… “, नीरजच्या आईने पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर केला प्रेमाचा वर्षाव
क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं, भालाफेकीत मोडला ऑलिम्पिक रेकॉर्ड! कोण आहे पाकिस्तानचा नवा सुपरस्टार अर्शद नदीम?
भारताच्या पाच पदकांवर पाकिस्तानचा एक ‘सुवर्ण’ भारी, पदकतालिकेत भारताला मोठा धक्का