---Advertisement---

नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, लौसान डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा ठरला पहिलाच इंडियन

On: शनिवार, ऑगस्ट 27, 2022 8:19 PM
Neeraj Chopra
---Advertisement---

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीतून सावरत जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने शुक्रवारी (२६ ऑगस्ट) ८९.०८मीटरचा थ्रो करत लौसान डायमंड लीग मीट या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. तो हे विजेतेपद मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. या विजयाबरोबरच त्याने सप्टेंबर महिन्यात झुरीच येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने या विजेतेपदाबरोबरच २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठीही पात्रता फेरीही गाठली आहे. लौसान डायमंड लीगमध्ये त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८९.०८ मीटर भाला फेकत दुसऱ्या खेळाडूंसाठी अडचण निर्माण केली. त्याचा हा कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला आहे. तसेच त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८५.१८ मीटरचा थ्रो केला आहे. तर तिसरा प्रयत्न त्याने केला नाही. चौथा प्रयत्नात त्याला बाद करण्यात आले तर पाचव्या प्रयत्नापासून त्याने दूर राहण्याचा निर्णय घेतला.

नीरजचा अंतिम थ्रो ८०.०४ मीटर राहिला. या लीगमध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या जेकब वाडलेज्चने ८५.८८मीटरचा थ्रो केला. यामुळे तो दुसऱ्या स्थानावर राहिला. युएसच्या कर्टिस थॉम्पसन याने ८३.७२मीटरचा थ्रो केल्याने तो तिसऱ्या स्थानावर राहिला.

या लीगमध्ये पहिले स्थान मिळवल्याने त्याला ८ गुण मिळाले आहेत. त्याने एकूण दोन डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता (चार स्पर्धांमध्ये भालाफेक झाली). यामुळे तो १५ गुण मिळवत चौथ्या स्थानावर राहिले. अव्वल सहा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. या लीगमध्ये पदके दिली जात नाही. तेथे खेळाडूंच्या प्रदर्शनावरून गुण दिले जातात.

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिलाच भारतीय

नीरजचा कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ थ्रो ८९.९४ मीटरचा आहे. हा थ्रो त्याने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. पानीपतच्या या भालाफेकपटूने डायमंड लीगचे विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. तसेच डायमंड लीगच्या अंतिम फेरीतही पोहोचणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. त्याच्या अगोदर विकास गौडा याने डायमंड लीगच्या अंतिम तीन खेळाडूंमध्ये जागी पक्की केली होती.

नीरजने मागील महिन्यात झालेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्ये ८८.१३ मी थ्रो करत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले होते. याच दरम्यान त्याला दुखापत झाली होती. यामुळेच त्याने कॉमनवेल्थ गेम्स २०२२मधून माघार घेतली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा मास्टर स्ट्रोक! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, वाचा प्लेइंग11
‘हिटमॅनचा सिक्स का बाबरचा क्लास?’ दुबईतील खेळपट्टी कोणाला करणार मदत, वाचा सविस्तर
‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---