स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं. यानंतर त्याच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका अंदाजानुसार, नीरजची ब्रॅन्ड व्हॅल्यू 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. आता या बाबतीत त्यानं स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मागे टाकलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी हार्दिक आणि नीरजची ब्रॅन्ड व्हॅल्यू जवळपास सारखीच होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजला मोठा फायदा झाला. फायनॅन्सशियल ॲडव्हायझरी क्रोल (Kroll) नुसार, नीरज चोप्राच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूनं 330 कोटी रुपयांना पार केलं आहे.
भारतात नीरज चोप्रा सर्वाधिक ब्रॅन्ड व्हॅल्यू असलेला नॉन क्रिकेटर आहे. नीरजनं टोकिया ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. यानंतर त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं. त्याच वेळी नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं जिंकली. यानंतर तिच्या ब्रॅन्ड व्हॅल्यू मध्ये देखील मोठी वाढ होत आहे. एका रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनू भाकर एका जाहिरातीसाठी 25 लाख रुपये घेत होती. आता हिच किंमत 1 कोटी पेक्षा जास्त झाली आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीची ब्रॅन्ड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. तो 1912 कोटी रुपयांच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो.
टॉप 10 भारतीय खेळाडूंची ब्रॅन्ड व्हॅल्यू (आकडेवारी रुपयांमध्ये)
विराट कोहली – 1912 कोटी
महेंद्रसिंह धोनी – 765 कोटी
सचिन तेंडुलकर – 760 कोटी
रोहित शर्मा – 343 कोटी
नीरज चोप्रा – 330 कोटी
हार्दिक पांड्या – 318 कोटी
पीव्ही सिंधू – 234 कोटी
केएल राहुल – 209 कोटी
सायना नेहवाल – 167 कोटी
सुनील छेत्री – 150 कोटी
हेही वाचा –
सर्वोत्तम कामगिरी करूनही नीरज चोप्रा निराश! म्हणाला, ‘मी माझ्या थ्रोमुळे…’
नीरज चोप्राने अवघ्या 14 दिवसांतच मोडला ऑलिम्पिक विक्रम, केला हंगामातील सर्वोत्तम थ्रो!
‘काही खास केले…’, राहुल द्रविडने 2 महिन्यांनंतर उघड केले विश्वविजेता बनण्याचे रहस्य